• Download App
    राजस्थानात मोदींच्या सभेतही क्रिकेट फिव्हर; म्हणाले, काँग्रेसवाले एकमेकांनाच रन आउट करतात, हिट विकेट होतात आणि मॅच फिक्सिंगही करतात!! Cricket fever in Modi's meeting in Rajasthan

    राजस्थानात मोदींच्या सभेतही क्रिकेट फिव्हर; म्हणाले, काँग्रेसवाले एकमेकांनाच रन आउट करतात, हिट विकेट होतात आणि मॅच फिक्सिंगही करतात!!

    विशेष प्रतिनिधी

    चुरू : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅचच्या आधी संपूर्ण देशावर क्रिकेटचा रंग चढला असताना त्यातून राजकीय पक्षांच्या सभाही सुटल्या नाहीत. Cricket fever in Modi’s meeting in Rajasthan

    त्यातही नरेंद्र मोदींसारखा क्रिकेट प्रेमी पंतप्रधान आपल्या भाषणातून क्रिकेटचा संदर्भ वगैरे ही शक्यताच नाही. याचेच प्रत्यंतर आज राजस्थान मधल्या भाजपच्या प्रचार सभेत आले. चुरू मतदारसंघातील तारानगर मध्ये मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रिकेटचा परिभाषेत काँग्रेसचा समाचार घेतला.

    – पंतप्रधान मोदी म्हणाले :

    आज-काल देशावर क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. पण क्रिकेटमध्ये बॅट्समन येतो आणि आपल्या देशासाठी रन्स बनवण्याचा प्रयत्न करतो, पण या काँग्रेसवाल्यांमध्ये भांडणेच एवढी आहेत की, ते एकमेकांनाच रन आउट करण्याच्या मागे लागले आहेत.

    राजस्थानातल्या काँग्रेस सरकारची पाच वर्षे काँग्रेसमधल्याच नेत्यांना एकमेकांना रन आउट करण्यात गेली निघून गेली. जे रन आउट झाले नाहीत आणि वाचले, ते महिलांविषयी आणि अन्य मुद्द्यांवर बनावट बयानबाजी करून हिट विकेट होत आहेत आणि जे हिट विकेट झाले नाहीत ते पैसे खाऊन, लाच देऊन स्वतःसाठी मॅच फिक्सिंग करत आहेत.

    काँग्रेसची टीमच एवढी खराब आहे की, हे काय रन बनवणार आणि राजस्थानच्या जनतेचे काय भले करणार??, हा प्रश्नच आहे.

    पंतप्रधान मोदी राजस्थानातल्या सभेनंतर थेट अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत – ऑस्ट्रेलिया फायनल मॅच पाहण्यासाठी दाखल झाले. पण त्यापूर्वी त्यांनी संपूर्ण देशावर चढलेल्या क्रिकेट फिव्हरचा आपल्या भाषणात पुरेपूर वापर करत काँग्रेसवर हल्लाबोल करून घेतला.

    Cricket fever in Modi’s meeting in Rajasthan

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!