• Download App
    dragon elephant ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येण्याच्या नुसत्या घोषणेनेच भारतातले मार्क्सवादी कम्युनिस्ट खूश!!

    ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येण्याच्या नुसत्या घोषणेनेच भारतातले मार्क्सवादी कम्युनिस्ट खूश!!

    नाशिक : चीन मधल्या तिनजिआंग मधून ड्रॅगन आणि एकत्र येण्याच्या नुसत्या घोषणा झाल्या, पण तेवढ्या घोषणांनीच भारतातले मार्क्सवादी कम्युनिस्ट खूश झाले. शी जिनपिंग यांच्या चिनी नेतृत्वाची स्तुती करायला लागले. पण त्याचवेळी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची स्तुती त्यांना करावी लागली. dragon elephant

    भारताच्या डोक्याला ट्रम्प टेरिफचा ताप झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी चीन मधल्या तिनजिआंग शहरात पोहोचले. तिथे त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय वाटाघाटी केल्या. त्या वाटाघाटींमध्ये शी जिनपिंग यांनी ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येण्यावर भर दिला. मोदींनी त्यांना उत्साही, पण सावध प्रतिसाद दिला. द्विपक्षीय वाटाघाटी मध्ये दोन्ही नेत्यांची सकारात्मक भाषणे झाली. पण मोदींनी भारत आणि चीन यांच्यातल्या सीमा वादाचा स्पष्ट उल्लेख करून त्यावर सकारात्मक तोडगा काढायची अपेक्षा व्यक्त केली.

    – एम. ए. बेबी यांची खुशी जाहीर

    या पार्श्वभूमीवर भारतातल्या मार्क्सवादी कम्युनिस्टांनी खुशी जाहीर केली. अमेरिकेचा वर्चस्ववाद झुगारण्यासाठी भारत आणि चीन एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे ड्रॅगन आणि हत्ती यांनी एकत्र आले पाहिजेत, अशी भाषा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी वापरली. ट्रम्प टेरिफचा भारताच्या डोक्याला ताप झालाय. पण भारत आणि चीन एकत्र येत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. कारण भारत आणि चीन जगातले दोन्ही सगळ्यात लोकसंख्येने मोठे असलेले देश आहेत. दोन्ही देशांमध्ये मनुष्यबळ आणि नैसर्गिक साधन संपत्ती विपुल आहे. दोघांच्याही हितासाठी त्यांनी एकत्र येणे आवश्यक आणि बरोबर आहे, अशी भाषा शी जिनपिंग यांनी वापरली होती. तीच भाषा बेबी यांनी रिपीट केली.

    त्या पलीकडे जाऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा अमेरिका विरोधी दृष्टिकोन त्यांनी पुढे रेटला. डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ अमेरिकेला सुद्धा तापदायक ठरणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नाहीतर सगळ्या जगाचे राष्ट्राध्यक्ष आहेत असे वागताहेत, असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेला त्यांच्या भोवती सगळे जग केंद्रित करायचे आहे पण भारत आणि चीन ते घडू देणार नाहीत, असे बेबी म्हणाले. एम. ए. बेबी यांच्या मुखातून शी जिनपिंग यांची भाषा रिपीट झाली पण त्याचवेळी त्यांना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची नाव न घेता स्तुती करावी लागली.

    – कम्युनिस्टांचे धोरणच परधार्जिणे

    भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते रशियाकडे बघायचे आणि मार्क्सवादी कम्युनिस्टांचे नेते चीनकडे बघायचे अशी त्यांच्यावर नेहमीच टीका होत आली, पण दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका बदलली नाही. बेबी यांच्या आजच्या वक्तव्यातून हेच राजकीय सत्य समोर आले. अमेरिकेच्या दबावानंतर भारत आणि चीन एकत्र आले, तरी त्यांच्यातले सीमा वादाचे अडथळे दूर झालेले नाहीत. याची जाणीव नरेंद्र मोदींनी राजनैतिक भाषेत शी जिनपिंग यांना करून दिली. तर ड्रॅगन आणि हत्ती एकत्र आले पाहिजेत, अशी अलंकारिक भाषा शी जिनपिंग यांनी वापरली, जी नेहरू काळात स्वप्नाळू भारतीय नेते वापरायचे. पण चीनच्या आक्रमणाचा अनुभव घेतल्यावर भारतीय नेत्यांची भाषा वास्तववादी झाली. तिचेच प्रतिबिंब पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणात पडले. हत्ती आणि ड्रॅगन एकत्र येण्याच्या शी जिनपिंग यांच्या आवाहनाला नरेंद्र मोदींनी उत्साही पण सावध प्रतिसाद दिला.

    तरीदेखील मार्क्सवादी कम्युनिस्टांच्या नेत्यांनी चीन मधून आलेल्या ड्रॅगन हत्ती एकत्र येण्याच्या नुसत्या घोषणेवर खुश होऊन अत्याआनंदाची प्रतिक्रिया व्यक्त केली. यातून जग बदलले, जागतिक परिस्थिती बदलली, भारतही बदलला तरी भारतातले मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते बदललेले नाहीत, याचेच प्रत्यंतर आले.

    CPI(M) leaders praise xi Jinping over his dragon elephant coming together statement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मोदींच्या भाषणात सामान्यांना हवे ते मुद्दे जोरावर; विरोधकांचे मुद्दे वाऱ्यावर!!

    Yasin Malik, : यासीन मलिकचा कबुलीनामा- व्हीपी-मनमोहनपर्यंत 7 सरकारांनी मला चर्चेत सामील केले

    मोदींच्या GST Reforms भाषणाचे भारतीय व्यापार महासंघाकडून स्वागत; पण काँग्रेस + तृणमूल काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांची टीका