• Download App
    कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याचा केंद्राचा इशारा; पण कोविशिल्ड, कोवॅक्सिन दोन्ही लसी डेल्टासह सर्व व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचा निर्वाळा Covidshield and Covaxin work against the variants of SARS CoV 2 — alpha, beta, gama as well as delta.

    कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याचा केंद्राचा इशारा; पण कोविशिल्ड, कोवॅक्सिन दोन्ही लसी डेल्टासह सर्व व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचा निर्वाळा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरली नसल्याचा इशारा केंद्र सरकारने आज दिला आहे. त्याचवेळी एक पॉझिटिव्ह बातमी दिली असून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी डेल्डासह कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचा निर्वाळा देखील केंद्र सरकारने दिला आहे. Covidshield and Covaxin work against the variants of SARS CoV 2 — alpha, beta, gama as well as delta.

    आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी आजच्या कोरोनाच्या स्थितीबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, की देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. आपण म्हणजे सर्व राज्यांनी आजही आधीएवढीच काळजी घेतली पाहिजे. पण त्याचवेळी एक चांगली बातमीही आहे की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी आतापर्यंत कोरोनाच्या सर्व वेरियंटवर प्रभावी ठरत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये डेल्टा वेरिएंटचा देखील समावेश आहे.

    गर्भवती महिलांना कोरोनावरील लस घेता येईल. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गर्भवती महिलांसाठीही लस सुरक्षित आणि उपयोगी आहे आणि ती त्यांनी घेतली पाहिजे, असे डॉ. बलराम भार्गव यांनी स्पष्ट केले.

    Covidshield and Covaxin work against the variants of SARS CoV 2 — alpha, beta, gama as well as delta.

    Related posts

    India Economy : 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5.25 पट वाढेल:अहवालात दावा- 21 वर्षांत दरडोई उत्पन्न ₹2.5 लाखांवरून वाढून ₹13.5 लाख होईल

    India Pakistan : भारत-पाकिस्तानने एकमेकांना अणु ठिकाणांची माहिती दिली; 35 वर्षांची जुनी परंपरा; ऑपरेशन सिंदूरदरम्यान किराणा हिल्सवर हल्ल्याची अफवा

    Indore : पाईपलाईनमधील गळतीमुळे दूषित पाणी; इंदूरमध्ये घातक जिवाणूमुळे 15 लोकांचा मृत्यू; मानवाधिकार आयोगाने अहवाल मागवला