• Download App
    आसाम सरकारची मोठी घोषणा : कोरोनामुळे पती गमावलेल्या विधवांसाठी अडीच लाखांची मदत योजना सुरू । Covid Widow Scheme Assam CM Himant Biswa Sarma Announces rs 2 point 50 lakh aid to Covid Widows in State

    आसाम सरकारची मोठी घोषणा : कोरोनामुळे पती गमावलेल्या विधवांसाठी अडीच लाखांची मदत योजना सुरू

    Covid Widow Scheme : आसाम सरकारने कोरोना पीडितांना मदत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोना महामारीमुळे पती गमावलेल्या विधवांसाठी एकरकमी अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत योजना सुरू केली आहे. यासाठी अट अशी आहे की, पीडितांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असावे. Covid Widow Scheme Assam CM Himant Biswa Sarma Announces rs 2 point 50 lakh aid to Covid Widows in State


    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : आसाम सरकारने कोरोना पीडितांना मदत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोना महामारीमुळे पती गमावलेल्या विधवांसाठी एकरकमी अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत योजना सुरू केली आहे. यासाठी अट अशी आहे की, पीडितांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

    वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, कोविड-19 विधवा साहाय्य योजनेंतर्गत एका कार्यक्रमात आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आठ जिल्ह्यांतील 176 विधवा महिलांना आर्थिक मदतीचे धनादेश दिले. या योजनेंतर्गत आतापर्यंत 873 महिलांची निश्चिती करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पुढील आठवड्यापर्यंत राज्यमंत्री या महिलांना धनादेश देतील. त्यांनी सांगितले की, आसाममध्ये कोरोना साथीच्या आजारामुळे 6,159 जणांचा मृत्यू झाला आहे.

    मुख्यमंत्री म्हणाले की, महामारीमुळे मृत्यू झालेल्यांपैकी 1347 जण इतर आजारांनी ग्रस्त होते. ते म्हणाले की, आम्ही कोरोना साथीच्या आजारामुळे पती गमावणाऱ्या 873 विधवांची निश्चिती केली आहे, परंतु ही संख्या दोन ते अडीच हजारांच्या आसपास असू शकते. पीडितांची नावे नोंदवण्याची प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्ह्यांत सुरू आहे. कोविड-19 मुळे प्रभावित कुटुंबांना निधी देण्याचे मी अर्थमंत्र्यांकडे आवाहन केले आहे.

    मुख्यमंत्री म्हणाले की, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब नाही. आम्ही जेव्हा जेव्हा सरकारी योजनांच्या लाभार्थींना आमंत्रित करतो तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो, परंतु आज आपण अभिमान बाळगणार नाही किंवा आनंदही साजरा करणार नाही. दरम्यान, अर्थमंत्री अजंता नियोग 16 जुलै रोजी 2021-22 चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे.

    Covid Widow Scheme Assam CM Himant Biswa Sarma Announces rs 2 point 50 lakh aid to Covid Widows in State

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!