झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात या महिलेने केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. मानती कुमारी प्रतिकूल परिस्थितीतही मागासलेल्या भागातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी ओसंडून वाहणारी नदी पार करते. तिच्या गावातून इतर खेड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मानतीला नदी ओलांडावी लागते.
कर्तव्याबद्दल पूर्ण भक्ती आणि समर्पण असेल तर कोणतेही कार्य अशक्य नाही. ए.एन.एम. मानती कुमारी यांनी हे सिद्ध केले आहे. मानती प्रखंडच्या जंगली भागात राहणार्या आदिवासी जमाती च्या उपचारासाठी पूर्णपणे समर्पित. आहेत. Covid warrior Queen of Jhansi!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना महामारीमध्ये आरोग्य कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत .व्हॅक्सिन संदर्भात अजूनही म्हणावे तितकी जागरूकता नाही .या सगळ्यात आरोग्य कर्मचारी कठीण परिस्थितीतही सामान्यांसाठी झटत आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. हल्लीच एका महिला कोरोना यौद्धाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील महुआडंडमध्ये या महिला एनएनएमने जे काही केले आहे ते इतरांसाठी एक उदाहरण आहे. आपल्या दीड वर्षाच्या मुलीला पाठीवर घेऊन इतरांच्या मुलांचे लसीकरण करणार्या या मातेला सलाम.
या आरोग्य कर्मचारी आपल्या पाठीवर चिमुकल्या बाळाला बांधून नदी पार करताना दिसत आहे. नदीच्या पलिकडे असलेल्या गावात जाऊन कोरोना संबंधित जागरूकता निर्माण करण्याचं काम करत आहेत.
हा फोटो झारखंडमधील आरोग्य कर्मचारी मानती कुमारींचा आहे. गेल्या काही दिवसांपासून मानती यांचा फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपलं कर्तव्य बजावत असताना आपल्या चिमुकल्या बाळाला पाठीवर बांधून नदी पार करण्याची जोखीम त्यांनी उचलली आहे.
बुढा नदी पार करून तिसिया, गोयरा आणि सुगाबांध या गावात जाऊन मुलांचं लसीकरण या करतात . मानतीचा हा फोटो सोशल मीडियावर आला तेव्हा तो अवघ्या काही वेळात व्हायरल झाला.
लसीकरणाच्या या मोहिमेमध्ये मानती कुमारी यांच्यासह त्यांचे पती सुनील ओरॉनही सहभागी आहेत. दररोज प्रवासात त्यांचा नवरा सोबत असतो. त्यांना दररोज 4 ते 5 कि.मी. प्रवास करावा लागतो परंतु खराब रस्त्यामुळे हे अंतर वाढते. मानती कुमारीला पंचायत क्षेत्रातील तिसिया, गोयरा आणि सुगाबांध अशा अनेक गावात मुलांना लस देण्यासाठी जावे लागत आहे.
झारखंडमधील अनेक भाग पूर बाधित!
संततधार पावसामुळे झारखंडच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती आहे. बर्याच भागात नद्यांना पूर येतो आहे, तर बरीच गावे पुरामुळे बाधित आहेत. पावसामुळे लातेहारातही अशीच परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत एएनएमचे हे पाऊल लोकांना प्रेरणा देणारे आहे .
Covid warrior Queen of Jhansi!
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी कार्यालय उदघाटनाला गर्दी, बारमध्ये कितीही लोक चालतात ; मग अधिवेशन दोनच दिवसच का ? ; देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर भडकले
- WATCH : शेवग्याचा पानांचा पौष्टिक पराठा; चवदार ब्रेकफास्ट रेसिपी
- पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्षपद नाराज काँग्रेसकडे ; शिर्डीचे राष्ट्रवादीकडे ; महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय
- कोरोनावरील बनावट औषधांचे पुणे कनेक्शन, विक्री प्रकरणी एकला अटक; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
- घरोघरी लसीकरणाच्या आशा पल्लवित ; राज्य सरकारचा सीलबंद अहवाल उच्च न्यायालायात