Covaxin : कोरोना महामारीचे देशात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू असतानाच लसीकरणही सुरू आहे. भारतात सध्या सीरमची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पूतनिक या लसींना मान्यता आहे. लवकरच इतर देशांतील लसीही भारतात उपलब्ध होण्याची आशा आहे. दरम्यान, पूर्णपणे स्वदेशी असलेल्या हैदराबाद स्थित भारत बायोटेकच्या लसीवर आधी अनेकांनी शंका घेतल्या होत्या. तथापि, अनेक चाचण्या व परीक्षणांनंतर ही लस पूर्णपणे सुरक्षित असून ती कोरोनावर प्रभावी असल्याचे समोर आलेले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR ने या कोव्हॅक्सिनवरील आपल्या संशोधनानंतर म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाच्या बहुतांश व्हेरिएंट आणि डबल म्युटेंटवरही अत्यंत परिणामकारक आहे. Covaxin : Covaxin effective on double mutants of corona, ICMR concludes research
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीचे देशात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू असतानाच लसीकरणही सुरू आहे. भारतात सध्या सीरमची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पूतनिक या लसींना मान्यता आहे. लवकरच इतर देशांतील लसीही भारतात उपलब्ध होण्याची आशा आहे. दरम्यान, पूर्णपणे स्वदेशी असलेल्या हैदराबाद स्थित भारत बायोटेकच्या लसीवर आधी अनेकांनी शंका घेतल्या होत्या. तथापि, अनेक चाचण्या व परीक्षणांनंतर ही लस पूर्णपणे सुरक्षित असून ती कोरोनावर प्रभावी असल्याचे समोर आलेले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR ने या कोव्हॅक्सिनवरील आपल्या संशोधनानंतर म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाच्या बहुतांश व्हेरिएंट आणि डबल म्युटेंटवरही अत्यंत परिणामकारक आहे.
कोरोनाच्या विविध रूपांतवर कोव्हॅक्सिन परिणामकारक
आयसीएमआरने आपल्या संशोधनात म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन कोरोनाच्या वेगवेगळ्या रूपांविरुद्ध लढा देऊ शकते. आयसीएमआरने म्हटले आहे की, ही लस कोरोनाच्या डबल म्युटेंट स्ट्रेनविरुद्धही प्रभावी आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेकने बनवलेली कोरोनावरील कोव्हॅक्सिन ही लस पूर्णपणे स्वदेशी लस आहे.
लसींच्या उत्पादन वाढीसाठी केंद्राकडून तरतूद
भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता या देशी लसीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आता मोदी सरकारने पाऊल उचलले आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेंअंतर्गत कोविड सिक्युरिटीच्या माध्यमातून स्वदेशी निर्मित लस विकासासाठी व उत्पादनास वेग देण्यासाठी मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने भारत बायोटेक कंपनीला 65 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरूमधील नवीन भारत बायोटेक सेंटरमध्ये लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी याचा उपयोग होईल.
Covaxin : Covaxin effective on double mutants of corona, ICMR concludes research
महत्त्वाच्या बातम्या
- दुर्दैवाचा हृदय पिळवटून टाकणारा फेरा : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीनंतर 22 रुग्णांचा तडफडून मृत्यू! बळींची संख्या वाढण्याची भीती
- कॅप्टन कुल धोनीच्या घरीही कोरोनाचा शिरकाव, संसर्गानंतर धोनीचे आई-वडील रांचीतील रुग्णालयात दाखल
- गँगस्टर विकास दुबे एन्काउंटर केसमध्ये यूपी पोलिसांना क्लीन चिट, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय