• Download App
    अमेरिकेत मुलांच्या लसीकरणास कोवॅक्सिनला मंजुरी देण्याची मागणी; सहयोगी कंपनी ओक्युजेनचा आग्रह । Covaxin approval requested in US for ages 2-18 by Bharat Biotech's partner

    अमेरिकेत मुलांच्या लसीकरणास कोवॅक्सिनला मंजुरी देण्याची मागणी; सहयोगी कंपनी ओक्युजेनचा आग्रह

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : अमेरिकेतील २ ते १८ वयोगटातील मुलांना कोवॅक्सिनचे लसीकरणास मंजुरी द्यावी, अशी मागणी भारत बायोटेकच्या वतीने केली आहे. भारत बायोटेकसोबत अमेरिकेतील सहयोगी कंपनी ओक्युजेनच्या वतीने ही मागणी केली आहे. सध्या अमेरिकेत १८ वर्षांखालील मुलांना अमेरिकेच्या फायझरची लस देण्यास मंजुरी दिली आहे. Covaxin approval requested in US for ages 2-18 by Bharat Biotech’s partner

    भारत बायोटेकचे अमेरिकेतील भागीदार कंपनी ओक्युजेनचे सीईओ म्हणाले की, जर मान्यता मिळाली तर, ज्या पालकांना मुलांना लस देण्यासाठी आणखी एक पर्याय त्यांना आणखी एक पर्याय कोवॅक्सिनच्या रूपाने मिळेल.



    विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सिन लसीला मान्यता दिली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही लस भारतात वापरण्यास अगोदरच मान्यता दिली असून ती अनेकांना टोचली आहे. दुसरीकडे भारत बायोटेकने भारतात विकसित केलेल्या कोवॅक्सिनला गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरास मान्यता मिळाली.

    आता यूएस आणि कॅनडासाठी भारत बायोटेकचे भागीदार, यूएस अन्न आणि औषध प्रशासनाला बालरोगाच्या आपत्कालीन वापर अधिकृततेसाठ विनंती सादर केली आहे.भारत बायोटेक द्वारे भारतातील २-१८ वर्षे वयोगटातील ५२६ मुलांवर केलेल्या चाचणीत ही लस उपयुक्त ठरली आहे. बालरोग क्लिनिकल चाचणीच्या निकालांवर आधारित ही मागणी केली आहे.

    Covaxin approval requested in US for ages 2-18 by Bharat Biotech’s partner

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Foreign Universities : 15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी; ऑगस्टपासून पहिली बॅच; परदेशी पदवी मिळेल, शिक्षणाचा खर्च होईल 30-40% कमी

    Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतरवर उपोषणाला सुरुवात केली; NEET पेपरफुटीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

    Prashant Kumar Dutta : आसामच्या माजी डीआयजींची 53 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; 7.23 कोटी उत्पन्नाच्या तुलनेत 79 कोटींची संपत्ती