विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआरच्या सहकार्याने विकसीत केलेली कोव्हॅक्सिन ही लस अल्फा आणि डेल्टा या कोरोना विषाणूच्या प्रकारांवर प्रभावी असल्याचा निर्वाळा अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) या संघटनेने दिला आहे.covaccine is very effective on delta
‘एनआयएच’ने कोव्हॅक्सिन घेतलेल्या व्यक्तींच्या रक्ताचे नमुने गोळा करून अभ्यास केला. यानुसार, या लशी भारतात सर्वप्रथम आढळलेल्या डेल्टा आणि ब्रिटनमध्ये प्रथम आढळलेल्या अल्फा या कोरोना विषाणूच्या प्रकारांवर प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले.
कोव्हॅक्सिन तयार करताना निष्क्रीय कोरोना विषाणूंचा वापर केला जातो. हे विषाणू प्रतिपिंड तयार करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती तयार करतात, असे ‘एनएचएस’ने म्हटले आहे. ही लस कोरोनाची साधारण लक्षणे दिसणाऱ्यांसाठी ७८ टक्के प्रभावी असून
कोरोनामुळे गंभीररित्या आजारी असलेल्या आणि रुग्णालयात दाखल केलेल्यांवर १०० टक्के प्रभावी ठरत असल्याचेही या अहवालात त्यांनी म्हटले आहे. भारतात आतापर्यंत अडीच कोटी जणांना कोव्हॅक्सिन देण्यात आली आहे.
covaccine is very effective on delta
महत्त्वाच्या बातम्या
- चीनी लस देणार लहान मुलांनाही कोरोनापासून सुरक्षा कवच
- विंबल्डनच्या टेनिस कोर्टवर शास्त्रज्ञ, संशोधकाना अनोखी मानवंदना
- ब्रिटनमध्ये तिसऱ्या लाटेची सुरुवात, वाढत्या रुग्णसंख्येने चिंता
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील तब्बल ७९८ डॉक्टरांचा मृत्यू
- शरद पवार हे पुणे जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्याला विधानसभेचे अध्यक्षपद देऊन काँग्रेसला पुनरूज्जीवनाची संधी देतील…??
- चीनी लस देणार लहान मुलांनाही कोरोनापासून सुरक्षा कवच