• Download App
    केजरीवालांच्या सुडाच्या राजकारणाला न्यायालयाचा दणका, कुमार विश्वास यांच्या अटकेला स्थगिती Court slams Kejriwal's revenge politics, stay on arrest of Kumar Vishwas

    केजरीवालांच्या सुडाच्या राजकारणाला न्यायालयाचा दणका, कुमार विश्वास यांच्या अटकेला स्थगिती

    पंजाब विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वो अरविंद केजरीवाल यांच्यावर खलिस्थानवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करणारे कवी कुमार विश्वास यांच्याविरुध्द सूडबुध्दीचे राजकारण सुरू केले आहे. मात्र, आपच्या या प्रयत्नांना दणका देत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने कुमार विश्वास यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे.Court slams Kejriwal’s revenge politics, stay on arrest of Kumar Vishwas


    विशेष प्रतिनिधी

    चंडीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वो अरविंद केजरीवाल यांच्यावर खलिस्थानवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करणारे कवी कुमार विश्वास यांच्याविरुध्द सूडबुध्दीचे राजकारण सुरू केले आहे.

    मात्र, आपच्या या प्रयत्नांना दणका देत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने कुमार विश्वास यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे.

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे फुटीरवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप े कुमार विश्वास यांनी केले होते. पंजाबमध्ये आपचे सरकार आल्यावर त्यांच्याविरुध्द सुडाचे राजकारण सुरू करण्यात आले. रोपडमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने अटकेला स्थगिती दिली आहे. तथापि, त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यासंबंधीच्या प्रकरणाची सुनावणी चालू राहणार आहे.

    काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा याही चौकशीत सहभागी होण्यासाठी रोपड पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. तथापि, त्यांच्याशी संबंधित प्रकरण पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात गेल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना माघारी पाठवले. मुलाखतीत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून केजरीवाल यांच्याविरुद्ध चुकीचे आरोप केले, असा लांबा यांच्यावर आरोप आहे. त्यानंतर रोपड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    Court slams Kejriwal’s revenge politics, stay on arrest of Kumar Vishwas

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे