वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने एका जवानाचे कोर्ट मार्शल केले आहे. यासोबतच त्याला 10 वर्षे 10 महिन्यांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानी दूतावासातील एका कर्मचाऱ्याला गुप्त माहिती दिल्याप्रकरणी या जवानाला दोषी ठरवण्यात आले होते. तो जवान भारताच्या उत्तरेकडील सीमेवर लष्कराच्या हालचालींची माहिती देत असे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जवानाचे कोर्ट मार्शल घेणाऱ्या समितीची प्रमुख एक महिला अधिकारी आहे.Court martial of Army jawan, 10 years and 10 months; He used to give secret information of the army to Pakistani spies
- सीमा हैदर यूपी एटीएसच्या ताब्यात; काका आणि भाऊ पाकिस्तानी लष्करात, 8 तास चौकशी; घराची सुरक्षा वाढवली
महत्त्वाची कागदपत्रे पाकिस्तानी हेरांना दिली
दिल्लीतील इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या आबिद हुसैन उर्फ नाईक आबिद या पाकिस्तानी नागरिकाला सदरी जवानाने आवश्यक कागदपत्रे पुरवल्याचे एएनआयने वृत्त दिले आहे. जवान कुठे तैनात होता याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्याने सर्व रक्षकांची ड्युटी लिस्ट पाकिस्तानी हेरांना पाठवली होती.
लॉकडाऊन काळातील वाहनांची यादीही दिली
कोविड लॉकडाऊन दरम्यान चालणाऱ्या वाहनांची माहितीही शिपायाने आबिद हुसैनला दिली होती, असे लष्कराच्या तपासातून समोर आले आहे. मुळात त्याच्याकडे किरकोळ स्वरूपाचीच माहिती होती. त्यामुळे त्याने मोठ्या प्रमाणात माहिती देऊ शकला नाही.
Court martial of Army jawan, 10 years and 10 months; He used to give secret information of the army to Pakistani spies
महत्वाच्या बातम्या
- पोर्ट सुदान विमानतळावर प्रवासी विमान कोसळले, चार लष्करी जवानांसह नऊ जणांचा मृत्यू!
- अजितदादांची मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स; भाजप नेत्यांचा इशारा; त्यानंतर सुनील तटकरेंचा चर्चेवर पडदा!!
- शिंदे – फडणवीसांच्या देखरेखीखाली अजित दादांचे निधी वाटप; पण आता ते ठाकरे गटाच्या टीकेचे धनी!!
- नुसते मोदी – योगींच्या नावांवर अवलंबून राहू नका, संघटना वाढवा; बी. एल. संतोष यांनी घेतला भाजप कार्यकर्त्यांचा क्लास!!