• Download App
    Chhatrapati Shivaji Maharaj डाव्यांचे वर्चस्व असलेल्या ‘जेएनयू’मध्ये छत्रपती

    Chhatrapati Shivaji Maharaj : डाव्यांचे वर्चस्व असलेल्या ‘जेएनयू’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम; अध्ययन केंद्रातून एमए पदवी

    Chhatrapati Shivaji Maharaj

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Chhatrapati Shivaji Maharaj एकेकाळी मार्क्स, लेनिनवादाचा किल्ला मानली जाणारी देशातील आघाडीची शिक्षण संस्था जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आता हिंदू शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित उच्च शिक्षणाची दारे खुली करत आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एमएची पदवी संपादन करू शकतील. जेएनयूमध्ये एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व केंद्रित अध्ययनाला सुरुवात होण्याची ही पहिलीच वेळ आहे.Chhatrapati Shivaji Maharaj

    त्याआधारे पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाईल. दोन वर्षांपूर्वी येथे अटलबिहारी वाजपेयी स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड आँत्रप्रेन्योरशिपची स्थापना झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील अध्यासनासाठी विद्यापीठात महाराष्ट्र सरकारच्या मदतीने 25 कोटी रुपयांतून भव्य दिव्य भवन बांधण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारी रोजी ३७५ व्या जयंतीनिमित्ताने २७ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या अध्ययन केंद्राचे काम सुरू होणार आहे.



    दोन विभागात रस्सीखेच

    विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरील अध्ययन केंद्र सुरू करण्यासाठी जेएनयूच्या दोन विभागांत रस्सीखेच पाहायला मिळाली. स्पेशल सेंटर फॉर नॅशनल सेक्युरिटी स्टडीजच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज गनिमी कावा ही युद्धकला तसेच सागरी युद्धात निष्णात होते. स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचा तर्क असा होता की जगभरातील विद्यार्थ्यांना या अभ्यासाकडे आकर्षित केले पाहिजे. शेवटी स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचा विजय झाला.

    हिंदू, जैन, बौद्ध अध्ययन केंद्रही लवकरच सुरू होणार

    सूत्रानुसार या संस्थेमध्ये यंदाचे संपूर्ण कॅलेंडर भारतीय अध्ययनावर आधारित असेल. त्यात श्रीमंत शंकरदेव यांच्याविषयी विशेष अध्ययन केंद्र सुरू केले जाणार आहे. ते आसामी भाषेतील प्रसिद्ध कवी, नाटककार, नर्तक, समाजसंघटक आणि हिंदू समाजसुधारक होते. सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज, हिंदू स्टडीज, जैन अध्ययन केंद्राशिवाय सेंटर फॉर आयुर्वेद अँड बायोलॉजीचा अभ्यासही यंदा सुरू होऊ शकतो. दक्षिणेतील आध्यात्मिक संत राजेंद्र चोला व आसामचे विद्वान लाचित बरफुकन यांच्यावर आधारित केंद्रही सुरू होणार आहे.

    Course on Chhatrapati Shivaji Maharaj in Left-dominated JNU; MA degree from study center

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!