• Download App
    कोरोनाव्हायरस अपडेट : तिसरी लाट आली? कोरोनाचे 33,750 नवीन रुग्ण, 123 मृत्यू, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 1700 वर । Coronavirus Update The Third Wave Corona 33,750 new patients, 123 deaths, 1700 omikron patients

    कोरोनाव्हायरस अपडेट : तिसरी लाट आली? कोरोनाचे ३३,७५० नवीन रुग्ण, १२३ मृत्यू, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या १७०० वर

    देशभरात ओमिक्रॉनचे सावट तर आहेतच, पण डेल्टाचा धोका अजूनही कायम आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने देशभर पसरू लागला आहे. देशाची राजधानी दिल्ली-मुंबईसोबतच पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्येही बाधितांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या 24 तासांत 33 हजार 750 नवे रुग्ण आढळून आले असून या कालावधीत 123 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ४५ हजार ५८२ झाली आहे. Coronavirus Update The Third Wave Corona 33,750 new patients, 123 deaths, 1700 omikron patients


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशभरात ओमिक्रॉनचे सावट तर आहेतच, पण डेल्टाचा धोका अजूनही कायम आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने देशभर पसरू लागला आहे. देशाची राजधानी दिल्ली-मुंबईसोबतच पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्येही बाधितांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या 24 तासांत 33 हजार 750 नवे रुग्ण आढळून आले असून या कालावधीत 123 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ४५ हजार ५८२ झाली आहे.



    मात्र, यादरम्यान कोरोनाचे १० हजार ८४६ लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात कोरोना बरे झालेल्यांची संख्या ३ कोटी ४२ लाख ९५ हजार ४०७ झाली आहे. तर, या साथीमुळे आतापर्यंत 4 लाख 81 हजार 893 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी, आतापर्यंत विक्रमी 145 कोटींहून अधिक लसीकरण करण्यात आले आहे. Omicron या कोरोनाच्या नवीन प्रकारातील रुग्णांची संख्या 1700 वर पोहोचली आहे. चांगली गोष्ट म्हणजे यातील ६३९ लोक बरे झाले आहेत.

    महाराष्ट्रात कोरोना अनियंत्रित

    महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. रविवारी कोरोना संसर्गाचे 11 हजार 877 नवीन रुग्ण आढळले, जे एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा 2 हजार 707 जास्त आहेत. यासोबतच ओमिक्रॉनची 50 प्रकरणे नोंदवली गेली. राज्याच्या आरोग्य विभागाने एका बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातही 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह, कोरोनामुळे मृतांचा आकडा 1 लाख 41 हजार 542 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या 11 हजार 877 रुग्णांपैकी 7 हजार 792 प्रकरणे फक्त मुंबईत आढळून आली आहेत.

    Coronavirus Update The Third Wave Corona 33,750 new patients, 123 deaths, 1700 omikron patients

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!