• Download App
    रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी, कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या धोक्यामुळे मोदी सरकारचा निर्णय CoronaVirus News modi government bans export of covid 19 rapid antigen testing kit

    रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी, कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या धोक्यामुळे मोदी सरकारचा निर्णय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका पाहता कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. CoronaVirus News modi government bans export of covid 19 rapid antigen testing kit

    देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या आता ५० हजारांच्या आत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची.त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटचा देशात तुटवडा पडू नये, यासाठी मोदी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.



    परराष्ट्र व्यापार महासंचलनालयानं (डीजीएफटी) याबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ‘कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटला निर्यातबंदीच्या यादीत टाकण्यात आलं आहे. हा निर्णय त्वरित लागू झाला आहे,’ असं डीजीएफटीनं अधिसूचनेत नमूद केले आहे.

    कोरोनाची तिसरी लाट आल्यास भारताला मोठ्या संख्येने चाचण्या कराव्या लागतील. त्याची तयारी म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. कोरोनाची तिसरी लाट आलीच, तर त्या परिस्थितीत देशातच कोरोना टेस्टिंग किट उपलब्ध असावीत या उद्देशाने किटच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

    CoronaVirus News modi government bans export of covid 19 rapid antigen testing kit

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Despite Trump : ट्रम्पच्या टॅरिफच्या धमकी नंतरही भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘अच्छे दिन’ सुरूच, जीडीपी 7.8 टक्क्यांवर

    Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा तोंडावर पडले, बिहारमधील गावकऱ्यांनी उघड केला खोटा दावा

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड