Corona Updates : देशात कोरोना संसर्गाच्या वेगाला ब्रेक लागल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत आता भारतात सर्वात कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी कोरोना रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर म्हणजेच 93.67 टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोरोना रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण 25व्या दिवशी दररोज येणाऱ्या नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त आहे. Coronavirus in India Latest Corona Updates Today 6 June 2021
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाच्या वेगाला ब्रेक लागल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत आता भारतात सर्वात कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी कोरोना रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर म्हणजेच 93.67 टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोरोना रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण 25व्या दिवशी दररोज येणाऱ्या नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 1.14 लाख नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 2600 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक दिवसापूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार म्हणजेच शनिवारी, भारतात कोरोनाचे १.२० लाख नवीन रुग्ण आढळले, तर कोरोनाचे 3380 रुग्ण मरण पावले. सध्या देशात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 15 लाखांपेक्षा कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी (06 जून 2021) सकाळी 8 वाजता कोरोनाचे आकडे जाहीर केले.
गेल्या 24 तासांत एकूण नवीन रुग्ण – 1,14,460
गेल्या 24 तासांत एकूण बरे झालेले – 1,89,232
गेल्या 24 तासांत एकूण मृत्यू – 2677
आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णसंख्या – 2,88,09,339
आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण – 2,69,84,781
आतापर्यंत एकूण मृत्यू – 3,46,759
देशातील सक्रिय रुग्णसंख्या – 14,77,799
एकूण लसीकरण – 23,13,22,417
Coronavirus in India Latest Corona Updates Today 6 June 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास, मुंबईतील रुग्णालयात दाखल
- मनी मॅटर्स : खरेदीवेळी संयमाची परिक्षा
- मेहूल चोक्सीच्या अटकेमागील बार्बरा जराबिका आहे तरी कोण? गर्लफ्रेंड की हनीट्रॅप?
- मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी पोटाला बॉँब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, अधिवेशन चालू देणार नसल्याचा नरेंद्र पाटील यांचा इशारा
- धनंजय मुंडेंनी केले त्याचे समर्थन करणार नाही; पण त्याचा राजकीय फायदाही घेणार नाही, पंकजा मुंडे यांनी केले स्पष्ट