वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या लढ्यात सध्या लस हेच एकमेव शस्त्र आहे. परंतु, आता त्याच जोडीला गंभीर रुग्णांना नवसंजीवनी देऊ शकणारे औषधही वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे केंद्राने या औषधाच्या आपत्कालीन वापरास मान्यताही दिली. ‘विराफीन’ (Virafin), असे औषधाचे नाव असून झायडस कॅडिला कंपनीने ते तयार केले आहे. गंभीर कोरोना रुग्णांना, विशेषत: ज्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, ऑक्सिजन कमी पडतोय, अशांना हे औषध दिल्यास खूप मदत होईल. कंपनीने दावा केला आहे की, गंभीर रुग्णांना विराफीन औषधामुळे लवकर रिकव्हरी करण्यास मदत होईल. झायडल कॅडिला कंपनीचा असाही दावा आहे की, हे औषध घेतल्यानंतर 7 दिवसांच्या आत रुग्णांची RT-PCR टेस्ट निगेटीव्ह आली असून 91.15 टक्के रुग्णांवर याचा परिणाम दिसला आहे. योग्यवेळी औषध दिल्यास कोरोनापासून बचाव होतो. औषधाला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DGCI ने आपत्कालीन वापरास मंजुरी दिली.’ Coronavirus drug formulation, produced from Zydus cadilla
पूर्वी ‘हेपेटायटीस सी’वर उपचारांसाठी वापर
डीजीसीआयने मंजूर केलेली झायडसच्या व्हिराफिन इंजेक्शनचे पूर्ण नाव पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा-2बी असे आहे. हे औषध मुळात लिव्हरचा आजार हेपॅटायटिस सीच्या उपचारांसाठी 10 वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. आता याला कोरोनावरील रुग्णांसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.
20-25 केंद्रांवर व्हेराफिनची चाचणी
देशभरातील 20 ते 25 केंद्रांवर व्हेराफिनची ट्रायल घेण्यात आली होती. झायडसने दावा केला आहे की, व्हेराफिन दिल्यानंतर कोरोना रुग्णांना ऑक्सिजन देण्याची खूप कमी गरज पडली. यावरून हे स्पष्ट झाले की, संसर्गित व्यक्तीला श्वास घेण्यास होणारा त्रास नियंत्रित करण्यास या औषधामुळे मदत झाली. देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अशाच प्रकारचा त्रास सर्वाधिक रुग्णांना आहे. त्यामुळे योग्य वेळी हे औषध बाजारात आले आहे.
तिसऱ्या मानवी चाचणीचा अहवाल
तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी भारतातील 50 रुग्णांवर केली होती. याचे निष्कर्ष प्रकाशित केले जातील. कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर लगेच हे औषध घेतल्यास रुग्ण वेगाने बरे होण्यास मदत होते, असा दावा कंपनीने केला आहे.
Coronavirus drug formulation, produced from Zydus cadilla
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी रद्द केल्या उद्या होणाऱ्या बंगालमधील सर्व सभा, कोरोना परिस्थितीवर घेणार उच्चस्तरीय बैठक
- अनास्थेचा परिणाम : जानेवारीतच केंद्राने कोरोना लाटेचा राज्यांना दिला होता इशारा, दुर्लक्षामुळे महामारीचा झाला उद्रेक
- ‘जिथे कमी तिथे आम्ही’ : ऑक्सिजनसाठी कॉर्पोरेट- सरकारी कंपन्यांचा पुढाकार, टाटा-रिलायन्ससह अनेक कंपन्या मैदानात
- ‘या पापी समाजाचा भाग असल्याची लाज वाटते’ म्हणत न्यायालयानेदेखील महाराष्ट्र सरकारपुढे टेकले हात
- पाकिस्तानात चिनी राजदूत थांबलेल्या हॉटेलमध्ये तेहरिक ए तालिबानकडून बॉम्बस्फोट, ४ जण ठार, १२ जखमी