प्रतिनिधी
नवी दिल्ली : “ऐन निवडणुकीत कोरोनाने केला घात; बडे नेते आले लोकांच्या दारात!!”, अशी स्थिती आता उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब मध्ये दिसू लागली आहे.Coronation in Ain election; Big leaders came to people’s door
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचे मोठे मेळावे, राजकीय नेत्यांच्या मोठ्या रॅल्या, पदयात्रा, मोटरसायकल किंवा सायकल यात्रा यांच्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना प्रचारात अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे बडे नेते आता रस्त्यारस्त्यांवर फिर ताना आणि लोकांच्या दारात जाताना दिसू लागले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिवसभर गोव्यात जनतेच्या दारोदारी जाऊन प्रचार पत्रके वाटली आणि आम आदमी पार्टीचा प्रचार केला. तर दुसरीकडे काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उत्तर प्रदेशातील नोएडाच्या रस्त्यावर उतरून घरोघरी चालत जाऊन काँग्रेसचा प्रचार केला.
अरविंद केजरीवाल आणि भूपेश बघेल हे दोन मुख्यमंत्री आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेले पहिले बडे नेते आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता अनेक नेते रस्त्यावर उतरून जनतेच्या दारोदार जाऊन आपापल्या पक्षांसाठी मते मागताना दिसणार आहेत.
राजकीय पक्षांचे मोठे मेळावे, मोठ्या नेत्यांच्या बड्या रॅल्या, मोटर सायकल यात्रा, पदयात्रा यांना निवडणूक आयोगाने 15 जानेवारीपर्यंत बंदी घातली होती. परंतु ती तारीख उलटून गेल्यानंतरही ही बंदी ठेवण्यात आलेली आहे. देशातली कोरोना परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे ही बंदी उठण्याची शक्यता कमी आहे,
असे गृहीत धरून बडे नेते मुकाटपणे रस्त्यावर उतरून जनतेच्या दारोदार पायी जाताना दिसत आहेत. यानिमित्ताने जनतेला मुख्यमंत्र्यांसारखे बडे नेते आपल्या दारात पाहून समाधानही वाटत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे.
Coronation in Ain election; Big leaders came to people’s door
महत्त्वाच्या बातम्या
- दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनावर ओढले ताशेरे , म्हणाले ….
- पुणे : ‘नव्याने होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जिल्ह्यातच होणार , ते कुठे होणार हे आताच सांगणार नाही ‘ – अजित पवार
- देशात लसीकरणाचे 1 वर्ष : भारताने आतापर्यंत 156 कोटी डोस दिले; सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताची कशी आहे कामगिरी, वाचा सविस्तर..
- प्रियांकांचा ४०% महिला उमेदवारांचा फॉर्म्युला फक्त “यूपी लिमिटेड”; पंजाबात ८६ उमेदवारांपैकी फक्त ७ महिला!!