• Download App
    कोरोना प्रभावित व्यक्तीला महिन्याची पगारी सुटी; युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा । Corona virus: Big decision of Yogi government, 1 month paid leave to Corona positive employee

    कोरोना प्रभावित व्यक्तीला महिन्याची पगारी सुटी; युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा

    वृत्तसंस्था

    लखनऊ : कोरोना प्रभावित व्यक्तीला महिन्याची पगारी सुटी दिली जाईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. त्यामुळे सरकारी; कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. Corona virus: Big decision of Yogi government, 1 month paid leave to Corona positive employee

    राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने हा निर्णय घेतला. कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना १ महिन्यांची पगार रजा आणि कोरोना व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना २१ दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.



    कंटेनमेंट झोनमधून येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यासही २१ दिवसांची सुटी मिळणार आहे. १ महिन्यांपेक्षा अधिक सु टी हवी असल्यास, नोंदणीकृत एलोपॅथी डॉक्टरकडून प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. कोरोनाशिवाय इतरही गंभीर आजारांसाठी ही सु टी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

    Corona virus : Big decision of Yogi government, 1 month paid leave to Corona positive employee

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही

    Cotton : कापड व्यापारी 31 डिसेंबरपर्यंत टॅरिफमुक्त कापूस आयात करू शकतील; वस्त्रोद्योग क्षेत्राला 50% अमेरिकन टॅरिफपासून वाचवण्याचा निर्णय

    Justice Nagaratna : न्यायमूर्ती नागरत्ना SCच्या कॉलेजियमशी असहमत; न्यायमूर्ती विपुल पंचोलींच्या SCत नियुक्तीवर आक्षेप