विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात 15 ते 18 वयोगटातील 5 कोटी मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत दिली. 15 वर्षांखालील बालकांच्या लसीकरणाचा निर्णय तज्ज्ञांची संमती मिळाल्यानंतर घेतला जाईल. त्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.Corona vaccine will soon be available for children under 15 years of age
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मांडविया म्हणाले, 15 ते 18 वयोगटातील सुमारे 67% मुलांचे आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. या वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोरोना लसीकरण मोहीम 3 जानेवारी 2022 रोजी सुरू झाली आणि या मोहिमेअंतर्गत अवघ्या 37 दिवसांत 5 कोटी मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
याउलट, जेव्हा 16 जानेवारी 2021 रोजी प्रौढांची कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली, तेव्हा 5 कोटी लसीकरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी सुमारे 42 दिवस लागले होते.भारतातील कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत देशात सुमारे 170 कोटी 77 लाख 65 हजार 220 लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे.
त्यापैकी 95 कोटी 35 लाख 80 हजार 976 जणांना पहिला डोस तर 73 कोटी 92 लाख 42 हजार 457 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज देशात एकूण 50 लाख 20 हजार 150 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, ज्यामध्ये 15 ते 18 वर्षे वयोगटातील 19 लाख 21 हजार 300 लोक आहेत.
Corona vaccine will soon be available for children under 15 years of age
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींच्या भाषणावर उगाच हैराण होऊ नये, त्यात महाराष्ट्र विरोधी काही नव्हते; खासदार नवनीत राणा यांचा सुप्रिया सुळे यांना टोला!!
- अरुणाचलच्या हिमस्खलनात सात जवानांचा मृत्यू
- कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद; काँग्रेस पक्षाने हिजाबच्या बाजूने संसदेत मांडली भूमिका!!
- “पहले हिजाब, फिर किताब”; कर्नाटकातील वादाचे महाराष्ट्र बीड मालेगाव मध्ये पडसाद!!