• Download App
    कोरोना लसीने वाचवले 42 लाखांहून अधिक भारतीयांचे प्राण! लॅन्सेटच्या संशोधनात दावा|Corona vaccine saves lives of over 42 lakh Indians! Claims in the Lancet research

    कोरोना लसीने वाचवले 42 लाखांहून अधिक भारतीयांचे प्राण! लॅन्सेटच्या संशोधनात दावा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोविड संकटात कोरोना लसीने जगभरात सुमारे 2 कोटी संभाव्य मृत्यू टाळले आहेत. लॅन्सेटच्या अभ्यासात हा महत्त्वाचा दावा करण्यात आला आहे. लॅन्सेट स्टडीने भारतातील कोविड संकटाबाबतही सांगितले आहे. असे म्हटले जात आहे की, कोरोनाच्या लसीने येथील सुमारे 42 लाख लोकांचे प्राण वाचवले आहेत, अन्यथा कोरोना विषाणूने एवढ्या लोकसंख्येला प्राणांना मुकावे लागले असते.Corona vaccine saves lives of over 42 lakh Indians! Claims in the Lancet research

    डिसेंबर 2020 ते डिसेंबर 2021 पर्यंतचा डेटा अभ्यासात घेण्यात आला आहे. तो सुरुवातीचा काळ होता आणि याच वेळी पहिल्यांदाच कोविडची लस मिळू लागली.



    5 लाखांहून अधिक जीव वाचले असते

    अभ्यासात असेही म्हटले आहे की जर जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) लक्ष्य पूर्ण केले गेले असते तर जगभरात आणखी 5,99,300 लोकांचे जीव वाचू शकले असते. डब्ल्यूएचओने 2021 च्या अखेरीस जगातील सर्व देशांतील 40 टक्के लोकसंख्येला कोविड लसीचे एक किंवा दोन डोस देण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, अनेक कारणांमुळे ते होऊ शकले नाही.

    लंडनच्या इम्पीरियल कॉलेजने हा अभ्यास केला आहे. प्रोफेसर ऑलिव्हर वॉटसन म्हणाले की मॉडेलिंग अभ्यासातून असे दिसून आले आहे की कोविड लसीकरणामुळे भारतात लाखो जीव वाचले आहेत. लसीकरणाचा चांगला परिणाम दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः भारत हा पहिला देश होता जिथे डेल्टा व्हेरिएंटमुळे बिकट परिस्थिती झाली होती.

    ताज्या परिस्थितीबद्दल बोलायचे तर भारतात 196 कोटींहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्याच वेळी, अधिकृत आकडेवारीनुसार, देशात कोविडमुळे आतापर्यंत पाच लाखांहून अधिक (5,24,941) मृत्यू झाले आहेत.

    बदलत्या काळानुसार आणि बदलत्या प्रदेशानुसार (देश) या लसीचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसून येत असल्याचेही अभ्यासात दिसून आले. अभ्यासानुसार, जेव्हा 2021 उजाडले होते तेव्हा व्हायरसने उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कहर केला, कारण तेथे कोविड अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आले होते.

    Corona vaccine saves lives of over 42 lakh Indians! Claims in the Lancet research

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!