• Download App
    राजस्थानात कोरोना लसी चक्क कचऱ्यात फेकल्या, अडीच हजारांहून अधिक डोस वाया|Corona vaccine dumped in Rajasthan, more than two and a half thousand doses wasted

    राजस्थानात कोरोना लसी चक्क कचऱ्यात फेकल्या, अडीच हजारांहून अधिक डोस वाया

    देशात कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रचंड तुटवडा आहे. लसीकरण केंद्रांसमोर रांगा लागलेल्या अहेत. अनेक केंद्रे बंद आहेत. मात्र, राजस्थानात कोरोना लसी चक्क कचऱ्यात फेकलेल्या आढळल्या आहेत. अडीच हजार लसी त्यामुळे वाया गेल्या आहेत.Corona vaccine dumped in Rajasthan, more than two and a half thousand doses wasted


    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : देशात कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रचंड तुटवडा आहे. लसीकरण केंद्रांसमोर रांगा लागलेल्या अहेत. अनेक केंद्रे बंद आहेत. मात्र, राजस्थानात कोरोना लसी चक्क कचऱ्यात फेकलेल्या आढळल्या आहेत. अडीच हजार लसी त्यामुळे वाया गेल्या आहेत.

    राजस्थानमधील ८ जिल्ह्यातील ३५ लसीकरण केंद्रांवर लसीचे ५०० व्हायल्स म्हणजे कुपी कचऱ्याच्या डब्यात आढळून आल्या आहेत. या ५०० व्हायल्समध्ये २ हजार ५०० हून अधिक डोस होते. त्या २० ते ७५ टक्के भरलेल्या आढळून आल्या.



    राजस्थानमध्ये १६ जानेवारी ते १७ पर्यंत ११.५० लाखांहून अधिक करोनावरील डोस फेकण्यात गेल्याचं केंद्र सरकारने म्हटले आहे. लसीचे डोस वाया जाण्याच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारचे आकडे वेगवेगळे आहेत.

    राज्यात लसीचे वाया जाण्याचे प्रमाण हे फक्त २ टक्के आहे, असा राजस्थान सरकारचा दावा आहे. एप्रिलमध्ये ७ टक्के आणि २६ मे महिन्यात ३ टक्के लसींचे डोस फेकण्यात गेल्याचं केंद्र सरकारने म्हटले आहे.

    ज्या लसीकरण केंद्रावर तपासणी करण्यात आली तिथे २५ टक्के लसींचा अपव्यय समोर आला. हे प्रकरण समोर आल्यानंतर राजस्थानच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव अखिल अरोरा यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

    Corona vaccine dumped in Rajasthan, more than two and a half thousand doses wasted

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये