वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लोकसभेतील ५४० खासदारांपैकी ४०३ खासदारांचे लसीकरण पूर्ण झाले असून त्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे अधिवेशनाला अधिक जोश चढणार आहे.Corona Vaccination of 403 Lok Sabha MPs completed; The rainy season will be even more exciting
अनेक खासदारांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. परंतु कोरोनाची लागण झाल्याने दुसरा डोस दिला नही. त्यामुळे आता जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन होणार आहे.
लस ३० खासदारांनी घेतली की नाही, याबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळे या संसदेचे कर्मचारी या खासदारांच्या संपर्कात आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन लवकर संपविले होते.
संसदेत अध्या ४० हून अधिक बिल आणि पाच अध्यादेश प्रलंबित आहेत. देशात आतापर्यंत ५० आमदारांना कोरोनाची लागण झाली. तर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्यासह तीन खासदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजही काही भागांत कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोना चाचणी आणि सोशल डिस्टन्सचे पालन करून अधिवेशन पार पाडले जाईल.