• Download App
    Corona vaccination update : कोरोनाविरोधी लसीकरणाची १०० कोटी डोसकडे वाटचाल: आतापर्यंत ९५ कोटी डोसचा टप्पा पूर्ण   । Corona vaccination drive towards 100 crore doses: 95 crore dose phase completed so far

    Corona vaccination update : कोरोनाविरोधी लसीकरणाची १०० कोटी डोसकडे वाटचाल: आतापर्यंत ९५ कोटी डोसचा टप्पा पूर्ण   

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशाने कोरोनाविरोधी लसीकरण वेगाने सुरु असून १०० कोटी डोस देण्याकडे वाटचाल सुरु ठेवली आहे. आतापर्यंत ९५ कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे. Corona vaccination drive towards 100 crore doses: 95 crore dose phase completed so far

    कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. तिसरी किंवा चौथी येऊ नये, त्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्याबरोबर कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम वेगाने राबविली जात आहे. लसीकरणाचे काम देशात वेगाने सुरु आहे. आता लसीकरण मोहिमेने ९५ कोटी डोस देण्याचा टप्पा ओलांडला आहे. ही एक जमेची बाजू आहे.



    केंद्र सरकारने नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मोफत उपलब्ध करून दिले आहेत. ते घेण्याची जबाबदारी मात्र नागरिकांची आहे. त्यासाठी कोविन अँप आणि लसीकरण केंद्रावर थेट जाऊन ही लस घेता येते.

    दरम्यान, गेल्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनाचे १८,१६६ नवे रुग्ण आढळून आले व २१४ जणांचा मृत्यू झाला. रुग्णांचा एकूण आकडा ३ कोटी ३९ लाखांवर गेला आहे. तसेच रुग्णांची ही संख्या गेल्या २०८ दिवसांतील सर्वात कमी आहे.

    Corona vaccination drive towards 100 crore doses: 95 crore dose phase completed so far

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!