• Download App
    Corona Vaccination : दोन लसींचे मिश्र डोस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ; स्वीडनच्या शास्त्रज्ञाचे प्रयोग झाले यशस्वी। Corona Vaccination A mixed dose of corona vaccine is effective in preventing corona

    Corona Vaccination : दोन लसींचे मिश्र डोस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ; स्वीडनच्या शास्त्रज्ञाचे प्रयोग झाले यशस्वी

    वृत्तसंस्था

    स्टाॅकहोम : दोन वेगवेगळ्या कोरोनाविरोधी लसींचे मिश्र डोस संसर्ग रोखण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात, असे स्वीडन येथील प्रयोगमध्ये आढळले. ज्यांनी ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर एमआरएनए लस घेतली त्यांना ॲस्ट्राझेनेका लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत कोरोना होण्याचा धोका कमी झाल्याचे आढळून आले.  Corona Vaccination A mixed dose of corona vaccine is effective in preventing corona

    स्वीडनमध्ये ६५ वर्षे वयाखाली लोकांना ॲस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस दिला, त्यापैकी काही लोकांना दुसरा डोस एमआरएनए लसीचा देण्यात आला. अशा लोकांना कोरोना होण्याचा धोका ॲस्ट्राझेनेका लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींपेक्षा कमी असतो, असे स्वीडनच्या उमिआ विद्यापीठाचे प्राध्यापक पीटर नाॅर्डस्ट्रॉम यांनी म्हटले आहे. या संशोधनावरचा लेख लॅन्सेट या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.



    स्वीडनमध्ये कोरोना लसींचे मिश्र डोस दिलेल्या लोकांच्या आरोग्याची तपासणी करून त्याआधारे निष्कर्ष काढला आहे. या प्रयोगामध्ये काही लाख नागरिकांचा समावेश होता. कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरच्या अडीच महिन्यांत त्या व्यक्तींच्या आरोग्याची तपासणी पुन्हा करण्यात आली.
    ॲस्ट्राझेनेका व फायझर लसींचे मिश्र डोस घेतलेल्या व्यक्तींना कोरोना होण्याचा धोका ६७ टक्के कमी होतो, असे प्रयोगात आढळले. ॲस्ट्राझेनेका व मॉडेर्ना लसींचे मिश्र डोस घेतलेल्यांना कोरोना होण्याच्या धोक्यात ७९ टक्के घट झाल्याचे आढळून आले. कोरोना लसींचे मिश्र डोस घेतल्याने दुष्परिणाम झाल्याच्या घटना खूपच कमी आहेत. ॲस्ट्राझेनेका लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी झाली.

    डेल्टा विषाणुला रोखते

    कोरोना लसींचे मिश्र डोस डेल्टा विषाणूविरोधातही खूप प्रभावी ठरले आहेत. जगभरात डेल्टा विषाणूंमुळेच कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. तसेच मृत्यूंची संख्याही वाढली. कोरोनाच्या विषाणूंमध्ये डेल्टा विषाणू हे अत्यंत घातक आहेत. पण, त्यावर मिश्र लस अधिक प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट झाले.

    Corona Vaccination A mixed dose of corona vaccine is effective in preventing corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे