Corona Updates in India : भारतात कोरोना रुग्णांच्या आकडेवारी वेगाने कमी होत आहे. मागच्या अनेक आठवड्यांपासून कोरोना संसर्गावर ब्रेक लागलेला दिसत आहे. परंतु कोरोना महामारीमुळे मरणाऱ्यांच्या संख्येत चढ-उतार सुरू आहे. गेल्या 24 तासांत देशात 1.20 लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, ही आतापर्यंतच्या 58 दिवसांनंतर म्हणजे एका दिवसात सर्वात कमी नवीन नोंद आहे. मात्र, मृतांचा आकडा पुन्हा वाढला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3300 पेक्षा जास्त रुग्ण मरण पावले आहेत. Corona Updates in India today 5th june 2021, Coronavirus Second Wave Updates
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांच्या आकडेवारी वेगाने कमी होत आहे. मागच्या अनेक आठवड्यांपासून कोरोना संसर्गावर ब्रेक लागलेला दिसत आहे. परंतु कोरोना महामारीमुळे मरणाऱ्यांच्या संख्येत चढ-उतार सुरू आहे. गेल्या 24 तासांत देशात 1.20 लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, ही आतापर्यंतच्या 58 दिवसांनंतर म्हणजे एका दिवसात सर्वात कमी नवीन नोंद आहे. मात्र, मृतांचा आकडा पुन्हा वाढला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3300 पेक्षा जास्त रुग्ण मरण पावले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 1.20 लाख नवीन रुग्ण आढळले, तर कोरोनाचे 3380 रुग्ण मरण पावले आहेत. त्याच वेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त रिकव्हरी रेट असल्याने कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आलेखही कमी होत आहे. आता भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 16 लाखांपेक्षा कमी आहे. शनिवारी (05 जून 2021) सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचे आकडे जाहीर केले.
गेल्या 24 तासांत एकूण नवीन रुग्ण – 1,20,529
गेल्या 24 तासांत एकूण बरे झालेले – 1,97,894
गेल्या 24 तासांत एकूण मृत्यू – 3,380
आतापर्यंतचे कोरोनाचे एकूण रुग्णसंख्या – 2,86,94,879
आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या – 2,67,95,549
आतापर्यंत कोरोनामुळे झालेले एकूण मृत्यू – 3,44,082
भारतात कोरोनाची एकूण सक्रिय प्रकरणे – 15,55,248
एकूण लसीकरण – 22,78,60,317
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस कमी होत आहेत. राष्ट्रीय स्तरावर कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर सुमारे 6.89 टक्के आहे, तर कोरोना संसर्गापासून बरे होण्याचे प्रमाण 93.38% आहे.
Corona Updates in India today 5th june 2021, Coronavirus Second Wave Updates
महत्त्वाच्या बातम्या
- Twitter ने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या वैयक्तिक हँडलवरून ब्लू टिक हटवली, थोड्याच वेळात रिस्टोर केली, संघाच्या अनेक नेत्यांचे हँडल अद्यापही अनव्हेरिफाइड
- World Environment Day ! पंतप्रधान मोदी यांचा ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ इथेनॉल- बायोगॅस वापरावर शेतकऱ्यांशी संवाद
- गोकुळधाम सोसायटीत आनंदी आनंद! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये नोंद
- Maharashtra Unlock ! अखेर ठरले…महाराष्ट्रात ७ जूनपासून अनलॉक ; ५ टप्प्यात लॉकडाऊन हटवणार ; मध्यरात्री नियमावली जाहीर
- वेश्याव्यवसायाचे थायलंड मॉडेल, चक्क सोशल मीडियावर परदेशी मुलींची जाहिरात करून चालविले जात होते सेक्स रॅकेट