Corona Updates : गुरुवारी देशात 51,255 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यादरम्यान 63,674 जणांनी कोरोनावर मात केली, तथापि, 1324 जणांचा मृत्यू झाला. गत 24 तासांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 13,783 ने घट झाली. सध्या देशात 6.07 लाख सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांचा कल पाहिला, तर 85 दिवसांनंतर सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाखांच्या खाली येत आहे. Corona Updates in India Today 25th june 2021 Latest Covid 19 Updates
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुरुवारी देशात 51,255 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यादरम्यान 63,674 जणांनी कोरोनावर मात केली, तथापि, 1324 जणांचा मृत्यू झाला. गत 24 तासांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 13,783 ने घट झाली. सध्या देशात 6.07 लाख सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांचा कल पाहिला, तर 85 दिवसांनंतर सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाखांच्या खाली येत आहे.
देशातील कोरोनाची सद्य:स्थिती
24 तासांतील नवे रुग्ण : 51,255
24 तासांत बरे झालेले : 63,674
24 तासांतील एकूण मृत्यू : 1324
आतापर्यंत एकूण कोरोना रुग्ण : 3 कोटी
आतापर्यंत एकूण बरे झालेले : 2.91 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : 3.93 लाख
सक्रिय रुग्णांची संख्या : 6.07 लाख
10 राज्यांत लॉकडाउनसदृश निर्बंध
देशातील 10 राज्यांत पूर्ण लॉकडाउनसारखे निर्बंध आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, मिझोराम, गोवा आणि पुडुचेरी यांचा समावेश आहे. मागील लॉकडाऊनप्रमाणे येथे कठोर निर्बंध लादले गेले आहेत.
21 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आंशिक लॉकडाउन
देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंशिक लॉकडाउन आहे. सूट तसेच निर्बंध आहेत. यामध्ये केरळ, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मेघालय, नागालँड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, आंध्र प्रदेश आणि गुजरातचा समावेश आहे.
Corona Updates in India Today 25th june 2021 Latest Covid 19 Updates
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावात लॉकडाऊन, राज्यातील आणखी 7 गावांतही टाळेबंदी
- JK Leaders Meet : जम्मू-काश्मीरवर साडेतीन तास मंथन, पंतप्रधान मोदींचा फ्यूचर प्लॅन, असे आहे टॉप 10 मुद्दे
- GOOD NEWS : महाराष्ट्रात 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक ; 5 हजारांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी ; वाचा सविस्तर
- Fact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं ? काय आहे सत्य;चकीत करणारे खुलासे
- India Corona Vaccination : देशात दिवसात ६० लाख जणांचे लसीकरण, महाराष्ट्र, गुजरात आघाडीवर; आतापर्यंत २.७४ कोटी नागरिकांना डोस