विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशातील कोरोना संक्रमणात झपाट्याने घट होते आहे, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केला आहे. मागील २४ तासात देशात २,०८,९२१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आणि ४,१५७ कोरोनाग्रस्तांनी जीव गमावला. Corona second wave will finish soon
हर्षवर्धन यांनी ट्विट करून सांगितले, की देशात संक्रमण दर सतत कमी होत आहे. रुग्ण संख्येतील घसरण यापुढे अशीच चालु राहील आणि हळूहळू कोरोनाची दुसरी लाट संपून जाईल, असा विश्वास वाटावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती देशासाठी चांगला संकेत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील २,९५,९५५ कोरोना रुग्णांनी या काळात महासाथीला हरविले आहे. दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ३ लाख ११ हजार ३८८ वर पोहोचली असून, लसीकरण झालेल्यांची संख्या २०,०६,६२४५ झाली, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
Corona second wave will finish soon
महत्त्वाच्या बातम्या
- सलमान खानचा केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला, राधेच्या निगेटिव्ह रिव्ह्यूमुळे भडकला ‘सुलतान’
- पंतप्रधान मोदींचे वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये बीजभाषण, जगभरातील बौद्ध संघ प्रमुखांशी व्हर्च्युअली संवाद
- 7 Years Of Modi Government : पीएम मोदींच्या ७ वर्षांच्या सत्तेतील देशात आमूलाग्र बदल करणारे ७ महत्त्वाचे निर्णय
- Coronavirus Cases in India : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ, २४ तासांत २.०८ लाख रुग्णांची नोंद, ४१५७ मृत्यू
- Whatsapp ने भारत सरकारविरुद्ध दाखल केला खटला, नव्या IT नियमांमुळे प्रायव्हसी संपण्याचा दावा