• Download App
    कोरोना रुग्णाला आले चक्क १ कोटी ८० लाख रुपये बिल, दिल्लीच्या मॅक्स हॉस्पीटलमधील प्रकार|Corona patient received a bill of Rs 1 crore 80 lakh in Max Hospital, Delhi

    कोरोना रुग्णाला आले चक्क १ कोटी ८० लाख रुपये बिल, दिल्लीच्या मॅक्स हॉस्पीटलमधील प्रकार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीतील मॅक्स हॉस्पीटलमध्ये एका कोरोना रुग्णाला चक्क १ कोटी ८० लाख रुपये बिल आले आहे. सुमारे चार महिने हा रुग्ण रुग्णालयात होता. हॉस्पीटलनेही ऐवढे बिल दिल्याचे मान्य केले आहे. रुग्णाला टाईप -२ मधुमेह, उच्च रक्तदाब, पित्ताशयाचा संसर्ग आणि मेंदूविकार असे गुंतागुंतीचे विकार होते. त्यामुळे ऐवढे बिल आल्याचे म्हटले आहे.Corona patient received a bill of Rs 1 crore 80 lakh in Max Hospital, Delhi

    कॉंग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना याबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी पत्र लिहिल आहे. मॅक्स हेल्थकेअर संस्थेने हे बिल कसे आले याचे विवरण द्यावे अशीही मागणी केली आहे. त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य आणि औषध उद्योगासाठी स्वतंत्र नियामक संस्था स्थापन करण्याची मागणी केली.



    रुग्णास १ कोटी ८० लाख रुपये बिल कसे दिले याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मॅक्स हेल्थकेअरकडून स्पष्टीकरण् मागवावे. रुग्णाची आर्थिक क्षमता असली तरी एवढे मोठे बिल करणे हा मानवतेविरुध्दचाच गुन्हा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आरोग्यासाठी स्वतंत्र नियामक स्थापन करण्यासाठी संसदेत विधेयक मंजूर व्हावे अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

    लोकसभेत २०२१ मध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी तत्कािलन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशभरातील आरोग्य क्षेत्रांत निर्माण झालेल्या विकृतींवर देखरेखीसाठी नियामक नेमण्याचे आश्वासन दिले होते याची आठवणही तिवारी यांनी मांडवीय यांना करून दिली आहे.

    Corona patient received a bill of Rs 1 crore 80 lakh in Max Hospital, Delhi

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार