कोरोनामुळे होणाºया मृत्यूची संख्या कमी करण्यात गोवा सरकारला मोठे यश आले आहे. कोरोनाचे निदान होण्यासाठी महत्वाच्या असलेल्या दोन चाचण्या मोफत केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे निदान लवकर होणे शक्य झालेआहे. त्यामुळे गोव्यातील मृत्यूदर कमी झाल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.Corona mortality rate has come down as two important tests are free, Vishwajit Rane said
विशेष प्रतिनिधी
पणजी : कोरोनामुळे होणाºया मृत्यूची संख्या कमी करण्यात गोवा सरकारला मोठे यश आले आहे. कोरोनाचे निदान होण्यासाठी महत्वाच्या असलेल्या दोन चाचण्या मोफत केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे निदान लवकर होणे शक्य झालेआहे.
त्यामुळे गोव्यातील मृत्यूदर कमी झाल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.राणे म्हणाले, कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी वेळेत आरोग्य सुविधा पुरविणारे गोवा हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
गोव्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या साडेचार हजार आहे. गोवा मेडीकल कॉलेजने मोफत डी-डीमर आणि इंटरल्युकिन चाचणी मोफत सुरू केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना लवकरात लवकर उपचार देणे शक्य झाले आहे.
राणे यांनी सांगितले की गोव्यातील रेमेडिसिवर इंजेक्शनचाही पुरेसा साठा आहे. पाच हजार इंजेक्शन राखीव ठेवण्यास सांगितले आहे.