• Download App
    चीन, कोरिया पाठोपाठ इस्त्रयालमध्ये कोरोनाचा शिरकाव; पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढली|Corona infiltration into Israel, followed by China and Korea; Removing the head again raised anxiety

    चीन, कोरिया पाठोपाठ इस्त्रयालमध्ये कोरोनाचा शिरकाव; पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : चीन,कोरिया आणि आता इस्त्रायलमध्ये आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढलं आहे. नव्या व्हेरियंटमुळे अनेकांना ग्रासले आहे.Corona infiltration into Israel, followed by China and Korea; Removing the head again raised anxiety

    चीनमध्ये अनेक शहरात खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन लागू केला. तेथील परिस्थिती आटोक्याबाहेर गेली. त्यानंतर दक्षिण कोरियात कोरोनाचा शिरकाव झाला. सुमारे ४ लाख लोक या आजाराने ग्रस्त झाले आहेत. त्यामुळे संक्रमण वेगाने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर इस्ट्रायलमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोके वर काढले आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत नवे संकट घोंघावत आहे.



    गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे संपूर्ण जगावर संकट कोसळले होते. कोरोना लसीकरण आणि घेण्यात येत असललेल्या खबरदारीमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत होते. कोरोना महामारीनंतर विस्कळीत झालेले जीवन पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, यातच एक चिंतेची बातमी समोर आली आहे.

    इस्त्रायलमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला आहे. यासंदर्भातील माहिती इस्त्रायल आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत या नव्या व्हिरियंटची दोन जणांना लागण झाली आहे. संबंधित दोन्ही रुग्ण गेल्या बुधवारी इस्त्रायलमध्ये परतले होते.

    इस्त्रायलमधील बेन गुरियन विमानतळावर झालेल्या कोरोना चाचणीत दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. या व्हेरियंटचा उगम इस्त्रायलमध्येच झाला असावा, असे आरोग्य मंत्रालयाचे संचालक नाचमॅन एश यांनी म्हटलं आहे. तथापि, यावर सध्या संशोधन सुरू आहे

    Corona infiltration into Israel, followed by China and Korea; Removing the head again raised anxiety

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य