वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : कोरोनाची साथ गेल्या दोन महिन्यांत ओसरली असताना पुन्हा त्याचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. या महासाथीचे केंद्र युरोप बनत आहे. युरोपिय महासंघातील काही देशांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तेथे लॉकडाउन जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
केवळ लसीकरणाने कोरोना आटोक्यात येऊ शकतो का, यावरही आता वाद-विवाद झडत आहेत. Corona increasing rapidly in Europe
नेदरलँड्समध्ये गेल्या तीन आठवड्यांसाठी अंशतः लॉकडॉउन जाहीर झाला असून बार व रेस्टॉदरंट लवकरच बंद केले जाणार आहेत. जर्मनीत कोरोनाचे निर्बंधांचे पालन करण्यासाठी कायदेशीर विधेयक तयार केले जात आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे अनिवार्य असेल. हे निर्बंध मार्च महिन्यांपर्यंत लागू असतील. चेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया आणि रशिया या तिन्ही देशांत कोरोनामुळे कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशांत नियम व निर्बंध लागू करण्याची घोषणा नॉर्वेच्या सरकारने काल केली. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्येत विक्रमी वाढ झाल्याने आइसलँडमध्ये कालपासून नियम कठोर केले आहेत.
Corona increasing rapidly in Europe
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी