• Download App
    सुरतमध्ये कोरोनाचे थैमान, दररोज 100 हून अधिक अंत्यसंस्कार, विद्युतदाहिन्यांची धुरांडीही वितळली । Corona in Surat, more than 100 funerals a day, Chimenys of electric crematorium melted

    सुरतमध्ये कोरोनाचे थैमान, दररोज १०० हून अधिक अंत्यसंस्कार, विद्युतदाहिन्यांची धुरांडीही वितळली

    Corona in Surat : कोरोनाच्या दुसरी लाटेने केवळ महाराष्ट्रच नाही, तर गुजरातच्या सुरतमध्येही अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनामुळे येथे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. यामुळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्याचे भयावह चित्र पुढे आले आहे. एवढेच नाही, तर सलग अंत्यसंस्कार सुरू असल्याने विद्युतदाहिनीचे धुरांडेही वितळू लागले आहे. Corona in Surat, more than 100 funerals a day, Chimenys of electric crematorium melted 


    विशेष प्रतिनिधी

    सुरत : कोरोनाच्या दुसरी लाटेने केवळ महाराष्ट्रच नाही, तर गुजरातच्या सुरतमध्येही अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनामुळे येथे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. यामुळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्याचे भयावह चित्र पुढे आले आहे. एवढेच नाही, तर सलग अंत्यसंस्कार सुरू असल्याने विद्युतदाहिनीचे धुरांडेही वितळू लागले आहे.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे दररोज 100 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. यामुळे धुरांडे थंड होत नाहीत, अति उष्णतेमुळे ते वितळत आहेत. त्याचप्रमाणे सुरतच्या रांदर आणि रामपुरा येथील स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारांसाठी रीघ लागलेली आहे. पूर्वी सरासरी येथे दिवसाला दोन ते तीन अंत्यसंस्कार व्हायचे, पण आता ही संख्या दहा ते पंधरावर गेली आहे.

    वाढणाऱ्या मृत्यूंमुळे येथे 14 वर्षांपासून बंद असलेले तापी नदीच्या काठचे कैलास मोक्षधाम पुन्हा उघडण्यात आले आहे. तीन दिवसांत येथे 50 हून अधिक पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. स्मशानभूमीवर अंत्यसंस्कारांसाठी तीन ते चार तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

    मागच्या आठवड्यापासून शहरातील स्मशाभूमींमध्ये दिवसरात्र मृतदेह जळत आहेत. शहरातील अश्विनीकुमार, रामनाथ घेला या दोन स्मशानभूमींमध्ये मोठी रांग पाहायला मिळत आहे. जवळपास 16 विद्युतदाहिन्यांमध्ये दररोज 100 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्या अविरत सुरू असल्याने त्यांच्यात बिघाड व्हायला सुरुवात झाली आहे. स्मशानभूमीत सध्या दिवसाकाठी 80 मृतदेह येत असल्याने सर्व विद्युतदाहिन्या अखंड सुरू आहे. सतत सुरू असल्याने विद्युतदाहिन्यांच्या चिमण्या उष्णतेने वितळल्या आहेत.

    Corona in Surat, more than 100 funerals a day, Chimenys of electric crematorium melted

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट