• Download App
    Corona in India : चिंता वाढली! देशात २४ तासांत तब्बल ३.३२ लाखांहून अधिक रुग्णांचा नोंद, २२५६ मृत्यू । Corona in India : Today More than 3.32 lakh patients registered in 24 hours in country, 2256 deaths

    Corona in India : चिंता वाढली! देशात २४ तासांत तब्बल ३.३२ लाखांहून अधिक रुग्णांचा नोंद, २२५६ मृत्यू

    Corona in India : भारतातील कोरोना महामारीमुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे समोर आले आहे. सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे देशात अनेक हॉस्पिटलमध्ये बेड आणि ऑक्सिजनचा अभाव आहे. त्याचबरोबर देशात आज (शुक्रवार) सलग दुसर्‍या दिवशी नवीन प्रकरणांच्या 3.32 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येसह मृत्युदरातही वाढ होताना दिसत आहे. मागच्या 24 तासांत देशभरात 2256 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. Corona in India : Today More than 3.32 lakh patients registered in 24 hours in country, 2256 deaths


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतातील कोरोना महामारीमुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे समोर आले आहे. सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे देशात अनेक हॉस्पिटलमध्ये बेड आणि ऑक्सिजनचा अभाव आहे. त्याचबरोबर देशात आज (शुक्रवार) सलग दुसर्‍या दिवशी नवीन प्रकरणांच्या 3.32 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येसह मृत्युदरातही वाढ होताना दिसत आहे. मागच्या 24 तासांत देशभरात 2256 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

    देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3.32 लाखांहून अधिक रुग्ण आढळल्याने सक्रिय रुग्णांची संख्या 24.21 लाखांवर गेली आहे. दुसरीकडे, मागच्या 24 तासांत 2250 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांच्या मृत्यूबरोबरच या एकूण मृत्यूंच्या संख्येत वाढ होऊन आकडा 1,86,928 वर गेला आहे. देशात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण कमी झाले असून हे आता 84 टक्क्यांपर्यंत आले आहे.

    देशातील कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात मागच्या आठवड्यापासून घट होत आहे. इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात एका दिवसात आढळणारी रुग्णसंख्या सर्वात जास्त आहे.

    कोरोनाची सद्य:स्थिती (स्रोत : वर्ल्डोमीटर)

    • गेल्या 24 तासांत एकूण नवीन रुग्ण : 3,32,503
    • 24 तासांत एकूण मृत्यू : 2256
    • भारतातील एकूण कोरोना रुग्णसंख्या : 1,62,57,309
    • कोरोनामुळे झालेली एकूण मृत्यूंची संख्या – 1,86,928
    • आतापर्यंत देशात बरे झालेल्यांची संख्या – 1,36,41,606

    महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान, 67 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद, 568 मृत्यू

    कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन असूनही एका दिवसात 67 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे 67,013 नवीन रुग्ण आढळले. तर 568 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 6,99,858 वर गेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाची एकूण संख्या 40,94,840 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत एकूण 62,479 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, राज्यात आतापर्यंत एकूण 33,30,747 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

    18 वर्षांवरील प्रत्येकासाठी लस, 28 एप्रिलपासून नोंदणीला सुरुवात

    कोरोनावरील लस देण्यासाठी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची नोंदणी कोविन अॅप किंवा आरोग्य सेतु अॅपवर 28 एप्रिलपासून सुरू होईल. देशातील लसीकरण मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्याअंतर्गत 1 मेपासून, 18 वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

    Corona in India : Today More than 3.32 lakh patients registered in 24 hours in country, 2256 deaths

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के