शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली सीमेजवळची हरियाणामधील काही गावं कोरोना हॉटस्पॉट झाल्याचा आरोप हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित करण्याचा सल्लाही दिला होता असे त्यांनी सांगितले. Corona hotspot in some villages in Haryana due to farmers’ agitation, alleges Chief Minister Manoharlal Khattar
प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली सीमेजवळची हरियाणामधील काही गावं कोरोना हॉटस्पॉट झाल्याचा आरोप हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित करण्याचा सल्लाही दिला होता असे त्यांनी सांगितले.
खट्टर म्हणाले, मी शेतकरी नेत्यांना महिन्याभरापूर्वी आवाहन केले होते की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मागे घ्या. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा आंदोलन करता येईल. मात्र आता या आंदोलनामुळे काही गावं की कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहेत. येथील काही गावकरी या आंदोलनाच्या ठिकाणी सतत ये-जा करत असल्याने हे घडले आहे.
हरियाणात मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. एक लाख सात हजार सक्रिय रुग्ण राज्यात आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था सध्या जेवढी गरज आहे त्यासाठी पुरेशी आह, असेही खट्टर यांनी म्हटले आहे.
दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. सीमेवरील मोकळ्या मैदानात शेतकरी तंबूमध्ये राहत आहेत. आंदोलनातील शेतकऱ्यांची संख्या कमी असली तरी याठिकाणी लोकांची सतत येजा चालू असते. पंजाब- हरियाणा या भागातून शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचे म्हटले जात आहे.
Corona hotspot in some villages in Haryana due to farmers’ agitation, alleges Chief Minister Manoharlal Khattar
महत्त्वाच्या बातम्या
- Coronavirus Vaccine राज्यात आज आणि उद्या लसीकरण नाही; कोविन अँप अपडेशनसाठी बंद राहणार
- बहुधर्मी आसामच्या मुख्यमंत्र्यांचे बांगलादेशाच्या पंतप्रधानांकडून अभिनंदन; मोदींच्या विकासवादी मार्गाने चालण्याची हेमंत विश्वशर्मांची ग्वाही
- वैकुंठ स्मशानभूमीत महिला करतात अंत्यसंस्कार ; कोरोनाच्या संकटात 15 जणींचा समाजाला मोठा हातभार
- अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन व्यथित; ब्लॉगवरील रसिकांच्या टोकदार कमेंटचा परिणाम
- आनंदाची बातमी : केंद्र सरकारतर्फे राज्यांना आणखी १९२ लाख लशीचे डोस मोफत
- सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा सरन्यायाधीशांचा प्रस्ताव