वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना लसीचा दुसरा डोस घेण्याची गरजच नाही, असे आयसीएमआरच्या (Indian Council of Medical Research) नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. आयसीएमआर ईशान्य आणि आसाम मेडिकल कॉलेज यांच्या संशोधनातून हा निष्कर्ष काढला आहे.
Corona healers do not need a second dose of the vaccine; Revealed from ICMR research
कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडिज तयार होतात. पहिल्या डोसनंतर या अँटिबॉडिजमध्ये वाढ होऊन मुबलक रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, असं या संशोधकांनी जाहीर केले.
वकिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी का नाही?; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ते ७५ वयोगटातील १२१ नागरिकांच्या अँटिबॉडिज टेस्टचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला. कोरोना झालेले आणि न झालेले असे दोन्ही नागरिक यात होते. लस घेण्यापूर्वी, पहिला डोस घेतल्यानंतर २५ ते ३५ दिवसांनी आणि मग दुसऱ्या डोसनंतर २५ ते ३५ दिवसांनी त्यांची अँटिबॉडी टेस्ट केली. ज्यांना पहिला डोस घेण्याअगोदर कोरोनाची लागण होऊन गेली होती, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता पहिल्या डोसनंतरच वाढत असल्याचं लक्षात आलं. शिवाय कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींमधील अँटिबॉडिजच्या संख्येत दुसऱ्या डोसनंतर विशेष फरक पडत नसल्याचंही दिसून आलं.
Corona healers do not need a second dose of the vaccine; Revealed from ICMR research
महत्त्वाच्या बातम्या
- अंमलबजावणी संचालनालयाचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी छापा, मनी लॉन्ड्रिंगचा आरोप
- Oxygen Audit Committee : तुटवड्याच्या काळात दिल्ली सरकारने ऑक्सिजनची गरज चार पट फुगवून सांगितली, सुप्रीम कोर्टाच्या ऑक्सिजन ऑडिट समितीचा अहवाल
- Corona Updates : एका दिवसात 51,225 नवे रुग्ण आढळले, 63,674 बरे झाले, 1324 जणांचा मृत्यू
- कोरोनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावात लॉकडाऊन, राज्यातील आणखी 7 गावांतही टाळेबंदी
- JK Leaders Meet : जम्मू-काश्मीरवर साडेतीन तास मंथन, पंतप्रधान मोदींचा फ्यूचर प्लॅन, असे आहे टॉप 10 मुद्दे