• Download App
    बिहारमध्ये कोरोनाचा कहर, अनेक राजकीय नेत्यांना प्रादुर्भाव, नितीशकुमारयांचे सचिवही पॉझिटिव्ह|Corona havoc in Bihar, exposure to many political leaders, Nitish Kumar's secretary also positive

    बिहारमध्ये कोरोनाचा कहर, अनेक राजकीय नेत्यांना प्रादुर्भाव, नितीशकुमारयांचे सचिवही पॉझिटिव्ह

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहारमध्ये कोरोनाने कहर केला आहे. डॉक्टरांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेक जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. मुख्यमंत्री निवासस्थान परिसरातील अनेक जण कोरोनाने बाधित झाले आहेत. त्यामुळे दुकाने रात्री आठ नंतर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.Corona havoc in Bihar, exposure to many political leaders, Nitish Kumar’s secretary also positive

    बिहारमध्ये कोरोनाच्या पहिल्या आणि दुसºया लाटेच्या वेळी रुग्णांची संख्या तुलनेने कमी होती. परंतु, तिसऱ्या लाटेत मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे सचिव अनुपम कुमार कोरोना पॉझिटिव्ह आहेत.



    राज्यातील अनेक मंत्री पॉझिटिव्ह आढळले आहेत. जनता दलाच्या कार्यालयातही अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांनाही संसर्ग झाला आहे.प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. पोलीस विभागातही अनेकांना संसर्ग झाला आहे.

    दरभंगाचे एसएसपी अवकाश कुमार यांना संसर्ग झाला आहे. जिल्हाधिकारी राजीव रौशन, डीडीसी तनय सुल्तानिया यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची चाचणी करण्यात आली आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. दुकाने रात्री ८ वाजता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ५,७८५ झाली आहे.

    Corona havoc in Bihar, exposure to many political leaders, Nitish Kumar’s secretary also positive

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य