• Download App
    हाँगकाँगमध्ये कोरोनाचा हाहाकार: मृत्यू वाढल्याने शवपेट्यांचा तुटवडा, मृत्यूदर पंधरापट जास्त । Corona crisis in Hong Kong: Coffin shortage due to rising death, death rate 15 times

    हाँगकाँगमध्ये कोरोनाचा हाहाकार: मृत्यू वाढल्याने शवपेट्यांचा तुटवडा, मृत्यूदर पंधरापट जास्त

    वृत्तसंस्था

    हाँगकाँग : हाँगकाँग आज कोरोनाचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट बनला आहे. देशातील बाधितांची संख्या १० लाखांहून जास्त झाली. पैकी सात लाख बाधित याच महिन्यात आढळून आले. दररोज सुमारे २२ हजार नवे बाधित आढळून येत आहेत. २५० हून जास्त जणांचा रोज मृत्यू होत आहे. त्यामुळे मृतदेहांसाठी आवश्यक शवपेट्यांची तुटवडा जाणवू लागला आहे. Corona crisis in Hong Kong: Coffin shortage due to rising death, death rate 15 times



    प्रति १० लाख लोकांमागे गेल्या आठवड्यात ३८ जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी ब्रिटन, स्पेनमधील मृत्युदराहून ही संख्या दुप्पट आहे. तेव्हा दोन्ही देशांत प्रति १० लाख लोकांमागे २० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील डेटानुसार हाँगकाँगचा मृत्युदर अमेरिकेच्या पीकपेक्षा तीनपट जास्त आहे. हाँगकाँगमध्ये नवीन बाधितांच्या तुलनेत मृत्युदर १.४ टक्के राहिला आहे. जगभरातील ०.२८ टक्क्यांहून पाच पट जास्त आहे. दक्षिण कोरियात सर्वाधिक ३.८५ लाख बाधित आढळून येत आहेत. त्यांचा मृत्युदर केवळ ०.०८ टक्के आहे.

    Corona crisis in Hong Kong: Coffin shortage due to rising death, death rate 15 times

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के