मदत आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा भीषण अपघात घडला आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. विशेष मदत आयुक्त कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्याचे आणि राज्य स्तरावरून अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास SRC ला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. Coromandel Express derails near Bahanaga station in Balasore Odisha
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात एक पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस ज्या ठिकाणी रुळावरून घसरली त्या ठिकाणी बचाव पथके रवाना झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
दक्षिण रेल्वेच्या सीपीआरओने एएनआयला सांगितले की कोरोमंडल एक्स्प्रेस ओडिशातील बालासोर येथील बहनगा स्थानकाजवळ रुळावरून घसरली. रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले आहेत.
Coromandel Express derails near Bahanaga station in Balasore Odisha
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी यांनी मुस्लिम लीगला दिले धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमाणपत्र, भाजपचा पलटवार- असे सांगणे त्यांची मजबुरी!
- Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण
- मुंबईच्या मालवणीत बांगलादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा