वृत्तसंस्था
जयपूर – काँग्रेससह बाकीचे सगळे विरोधी पक्षनेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना वैयक्तिक टार्गेट करीत असले, तरी लोकप्रियतेच्या बाबतीत मोदीच त्यांच्यावर मात करत आले आहेत. त्यांचे लोकप्रियतेचे वेगवेगळे फंडे आहेत. त्यावर विरोधकांना अजून तरी तोड सापडलेली नाही. त्यामुळे मोदी आपल्या लोकप्रियतेसाठी जे फंडे वापरतात, त्याचीच कॉपी विरोधक करतात.
याचा प्रत्यय आता राजस्थानात येतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी परीक्षेवर चर्चा करतात. जानेवारी – फेब्रुवारीत आता हा प्रघातच पडून गेला आहे. ही परीक्षेवरची चर्चा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कमालीची लोकप्रिय आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोदींची वेगळी कॉपी मारण्याचा प्रयत्न चालविला आहे.
प्लॅस्टिकची बाटली, मोदी जॅकेटवर “अशी” सजली : मोदींच्या अनोख्या जॅकेटचा फोटो प्रचंड व्हायरल
अशोक गेहलोत यांनी राजस्थानातल्या सर्व सरकारी आणि खासगी विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना एक फतवा काढून पाठविला आहे. राजस्थान विधानसभेत उद्या १० फेब्रुवारीला अशोक गेहलोत अर्थमंत्री या नात्याने राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याचे लाईव्ह प्रसारण सर्व विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये करण्याचा हा फतवा आहे. बजेट सादरीकरणाच्या लाईव्ह प्रसारणाची व्यवस्था सर्व विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी स्वतः करायची आहे. त्याला सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी यांना हजर ठेवण्याची जबाबदारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांवर सोपविली आहे.
उद्याचे बजेट अशोक गेहलोत सादर करतील, तेव्हा ते सर्व विद्यार्थांनी पाहावे, अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे. राजस्थानचे २०२३ चे बजेट हे निवडणूक बजेट असणार आहे. मोफत वीज, मोफत पाणी अशा सवलत योजनांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ते विशेष सवलती, महाविद्यालये, विद्यापीठे यांच्यासाठी विशेष पॅकेज यांच्या घोषणा ते करणार आहेत. हे सर्व बजेट विद्यार्थांनी लाईव्ह पाहावे. त्यावर राज्यात उच्चशिक्षित चर्चा घडावी, असा अशोक गेहलोत यांचा हेतू आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने तो फार महत्त्वाचा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर परीक्षेवर चर्चा करून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये लोकप्रिय होऊ शकतात, तर आपण पण बजेट सादर करताना विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये लाईव्ह दिसून तितकेच लोकप्रिय ठरू शकतो, असा अशोक गेहलोत यांचा राजकीय होरा आहे. मोदींना तर परीक्षेवर चर्चेचा परिणाम निवडणूकांमध्ये मिळून गेला. अशोक गेहलोतांना विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये लाईव्ह बजेट सादरीकरणाचा परिणाम कसा आणि किती मिळेल??, हे येत्या विधानसभा निवडणूकीत दिसून येईलच.
copy modi : rajsathan cm ashok gehlot budget presentation will go on live in all universities and collages on 10 feb 2023
महत्वाच्या बातम्या