विशेष प्रतिनिधी
लखनऊ : नक्षलवादी, सायबर गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या गोष्टी रोखण्यासाठी राज्य पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यात उत्तम समन्वयाची गरज असल्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.Coordination between state police and central agencies is needed, appeals Amit Shah
लखनऊ येथील पोलीस मुख्यालयात राज्यांचे पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसीय 56 व्या परिषदेचे उद्घाटन करताना शहा बोलत होते. कोविड-19 साथीच्या काळात सुरक्षा दलांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले.
देशपातळीवर उत्कृष्ठ कामगिरीसाठी नवी दिल्लीच्या सदर बाजार पोलिस स्टेशन, ओडिशातील गंगापूर पोलिस स्टेशन आणि हरियाणातील भट्टू कलान पोलिस ठाण्यांना गौरविण्यात आले. अमित शहा शहा म्हणाले, सागरी किनारी सुरक्षा, वामपंथी अतिरेक, अंमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे आणि सीमा क्षेत्र व्यवस्थापन यासह सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
त्यासाठी राज्यातील पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यात योग्य समन्वय हवा. कट्टरतावादामुळे निर्माण झालेली आव्हाने परतून लावण्यासाठी हे गरज आहे.ही परिषद हायब्रीड पद्धतीने आयोजित केली जात आहे.
लखनौ येथील यूपी पोलिस मुख्यालयात पुढील दोन दिवस सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक उपस्थित राहतील. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कइ कार्यालयांमधून व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मद्वारे सुमारे 350 इतर अधिकारी यात उपस्थित राहतील.
Coordination between state police and central agencies is needed, appeals Amit Shah
महत्त्वाच्या बातम्या
- कॅ. अमरिंदर सिंग भाजपासोबत लढविणार निवडणूक, कृषि कायद्याचा विषय नसल्याने अकाली दलही सोबत येणार
- फरार आर्थिक गुन्हेगारांना देशात परतण्याशिवाय पर्याय नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
- कृषी कायदे रद्द मोंदींकडून; श्रेय घ्यायला काँग्रेस पुढे; पंजाबमध्ये उभारणार शेतकरी आंदोलनाचे स्मारक!!
- समान नागरी कायद्याची सक्ती गरजेची, उच्च न्यायालयाने व्यक्त केले मत