• Download App
    Goa गोव्यात परदेशी महिलेवर बलात्कार अन् हत्या प्रकरणी

    Goa : गोव्यात परदेशी महिलेवर बलात्कार अन् हत्या प्रकरणी दोषीला जन्मठेपेची शिक्षा

    Goa

    संबंधित महिला मार्च २०१७ मध्ये गोव्याला भेट देण्यासाठी आली होती.


    विशेष प्रतिनिधी

    पणजी : Goa  गोव्यात परदेशी महिलेवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाने दोषीला कठोर शिक्षा सुनावली आहे. आयर्लंड-ब्रिटिश नागरिक असलेल्या महिलेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याप्रकरणी स्थानिक रहिवासी विकट भगतला सोमवारी दोषी ठरवण्यात आले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.Goa

    १४ मार्च २०१७ रोजी दक्षिण गोव्यातील कॅनाकोना गावातील जंगलात आयर्लंड-ब्रिटिश महिला नागरिकाचा मृतदेह आढळला. वायव्य आयर्लंडमधील डोनेगल येथील २८ वर्षीय महिला मार्च २०१७ मध्ये गोव्याला भेट देण्यासाठी आली होती. या काळात भगतची तिच्याशी मैत्री झाली. यानंतर, एके दिवशी भगतने महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली.


    वृत्तानुसार, पीडितेच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या आणि मृतदेह नग्न अवस्थेत आढळला होता. तर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी भगतला बलात्कार आणि हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि २५,००० रुपये दंड ठोठावला.

    याशिवाय, पुरावे नष्ट केल्याबद्दल त्याला दोन वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला. दोन्ही शिक्षा एकाच वेळी लागू होतील असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या खटल्याची बाजू मांडणारे वकील विक्रम वर्मा म्हणाले की, पीडितेच्या कुटुंबाने या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे.

    Convict sentenced to life imprisonment for rape and murder of foreign woman in Goa

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!