कॉल डिटेल्स तपासल्यानंतर सर्व माहिती आली समोर.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑनलाइन गेमिंगद्वारे धर्मांतर प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शाहनवाज उर्फ बद्दोवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच NSA लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे. गाझियाबाद पोलिसांना बद्दोविरुद्ध अनेक पुरावे सापडले आहेत, त्यानंतर त्याच्यावर एनएसए लावला जाऊ शकतो. गाझियाबाद शहराच्या डीसीपींनी ही माहिती दिली आहे. एवढंच नाहीतर बद्दोचे पाकिस्तानशी असलेले संबंधही समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर ही सर्व माहिती समोर आली आहे. Conversion Racket Preparing to impose NSA on Baddo the mastermind of the conversion racket
गाझियाबाद शहर डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, शाहनवाज उर्फ बद्दोच्या कॉल डिटेल्समध्ये मोठा खुलासा झाला आहे. त्याचे ३० पाकिस्तानी नंबर्सशी संभाषण झाल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय बद्दोकडून दोन मेल आयडीही मिळाले असून त्यापैकी एक पाकिस्तानचा आहे. बद्दोच्या पीओकेमध्ये बसलेल्या एका व्यक्तीकडून पोलिसांना चॅटही मिळाला आहे. याशिवाय लाहोरच्या वाहतूक निरीक्षकाचे ओळखपत्रही जप्त करण्यात आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? –
गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एक मुलगा दिवसातून पाच वेळा जिमच्या बहाण्याने नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जात असे. यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यावर एका व्यक्तीने ऑनलाइन गेमिंगमुळे त्याचे ब्रेनवॉश केल्याचे आढळून आले. या प्रकरणाचे तार इतर ठिकाणांहूनही जूडू लागले आणि धर्मांतराचे रॅकेट उघड झाले. या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत होता. अखेर गाझियाबाद पोलिसांच्या पथकाने आरोपी शाहनवाज मकसूद खान उर्फ बद्दो याला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून अटक करून ट्रान्झिट रिमांडवर गाझियाबादला नेले.
गाझियाबादला आणल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांनी बद्दोची काही काळ चौकशी केली. महाराष्ट्रातील रायगड येथून बद्दोला अटक केल्यानंतर ठाणे न्यायालयाने त्याला ७२ तासांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली होती.
Conversion Racket Preparing to impose NSA on Baddo the mastermind of the conversion racket
महत्वाच्या बातम्या
- ‘निवडणुका येताच हंगामी हिंदू दिसतात’, राजनाथ सिंह यांचा प्रियांकांचे नाव न घेता टोला!
- ओबीसी आरक्षणावरून नड्डांची बिगर भाजपाशासीत राज्य सरकारांवर टीका, म्हणाले…
- जनतेच्या मनात मी आणि देवेंद्रच आहोत, हे पहा ना!!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना खोचक प्रत्युत्तर
- चुनावी हिंदू नंतर आता काँग्रेसवर मौसमी हिंदू झाल्याची टीका; राजनाथ सिंहांचा प्रहार