वृत्तसंस्था
हैदराबाद : प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप आमदार टी. राजा सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, त्यांच्या सुटकेचे आदेश आल्याने ते तुरुंगाबाहेर आले. टी राजा यांच्या सुटकेची बातमी येताच त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली असतानाच दुसरीकडे त्यांच्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या लोकांमध्ये त्यांच्या सुटकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.Controversy over T Raja’s release Protests outside Hyderabad’s four minarets, police vehicle vandalized
टी. राजा घरी परतताच त्यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांची गर्दी जमली. त्याचवेळी त्यांच्या वक्तव्याने संतप्त झालेल्या लोकांनी रस्त्यावर उतरून रात्री उशिरापर्यंत निदर्शने केली. हैदराबादमध्ये टी. राजाविरोधात मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांना फाशीची मागणी केली. या संतप्त लोकांनी हैदराबादच्या चार मिनारवर तैनात असलेल्या पोलिस दलाच्या वाहनांवर हल्ला केला आणि तोडफोड केली.
‘सर तन से जुदा’चे नारे
त्याच वेळी टी. राजा यांच्या वक्तव्याचे आणि त्यांच्या सुटकेच्या विरोधात निदर्शनाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओंमध्ये लोक ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देताना दिसत होते, तसेच ‘फाशी’च्या घोषणाही दिल्या जात होत्या. टी. राजा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. त्याचवेळी त्यांची पक्षातून हकालपट्टी का करू नये, अशी विचारणा करत पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी
दरम्यान, टी. राजा सिंह यांनी सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ते कॉमेडियन मुनव्वर फारुकी याच्यावर बोलताना दिसले. यावेळी त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले. याआधी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनीही पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती, त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्याचवेळी देशभरातील लोकांमध्ये नुपूर शर्माविरोधात संताप दिसून येत होता.
Controversy over T Raja’s release Protests outside Hyderabad’s four minarets, police vehicle vandalized
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका आरोग्य सेविकांच्या मानधनात मोठी वाढ!!
- भारत – चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील 500 गावांचे मोदी सरकार करणार पुनर्वसन!!
- बेनामी संपत्तीसाठी ३ वर्षांच्यातुरुंगवासासंबंधीचा कायदा रद्द, पूर्वलक्षी प्रभावाने जप्तीची कारवाई नाही
- काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षी राजकीय कार्यक्रमांपूर्वी सोनिया, राहुल, प्रियांका यांचा एकत्र परदेश दौरा