• Download App
    चार बायका आणि चाळीस मुलांवाले तुमच्या सगळ्यावर मालमत्तेवर कब्जा करणार आहेत, भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे वादंग|Controversy over BJP leader's statement that four wives and forty children are going to occupy all your property

    चार बायका आणि चाळीस मुलांवाले तुमच्या सगळ्यावर मालमत्तेवर कब्जा करणार आहेत, भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे वादंग

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : चार बायका आणि चाळीस मुलांवाले तुमच्या सगळ्या मालमत्तेवर कब्जा करणार आहेत. उत्तर प्रदेशातील अनेक शक्ती या प्रदेशाला तालीबान बनवू पाहत आहे. त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एकच माणूस तलवार घेऊन उभा आहे.Controversy over BJP leader’s statement that four wives and forty children are going to occupy all your property

    ते म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, असे वक्तव्य एका भाजप नेत्याने केले आहे. त्यामुळे वादंग निर्माण झाला आहे.भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष प्रांशुदत्त द्विवेदी यांनी हे वक्तव्य केले आहे. द्विवेदी म्हणाले, उत्तर प्रदेशात अशा अनेक शक्ती कार्यरत आहेत



    ज्या राज्याला तालीबान बनवू पाहत आहेत. उत्तर प्रदेशातील लोकसंख्येत त्यांना घुसखोरी करायची आहे. त्यांची लोकसंख्या जेव्हा तुमच्यापेक्षा जास्त होईल तेव्हा तुमच्या मुलीबाळी आणि घरावर त्यांना कब्जा करायचा आहे.

    तुम्ही कष्टाने मिळविलेली संपत्ती त्यांना हिसकावून घ्यायची आहे. मात्र, या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये तलवार घेऊन एक माणूस उभा आहे तो म्हणजे योगी आदित्यनाथ. मी हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

    योगी आदित्यनाथ हे होऊ देणार नाहीत.द्विवेदी यांच्या वक्तव्यांनंतर वादंग निर्माण झाले आहे. अनेकांनी दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अशा वक्तव्यांतून होत असल्याची टीका केली आहे.

    Controversy over BJP leader’s statement that four wives and forty children are going to occupy all your property

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत