• Download App
    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्यावरून वाद, तेलंगणा काँग्रेस उद्या 709 पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल करणार । Controversy over Assam Chief Minister Himanta Biswa Sarma's statement, Telangana Congress to lodge complaint in 709 police stations tomorrow

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्यावरून वाद, तेलंगणा काँग्रेस उद्या 709 पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल करणार

    Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण तापले आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीने आज एक ठराव संमत करून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना तत्काळ बडतर्फ करण्याची आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी केली आहे. तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी म्हणाले की, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे वक्तव्य गांधी कुटुंब किंवा काँग्रेसच्याच विरोधात नाही तर मातृत्वाचा अपमान आहे. काँग्रेस कार्यकर्ते 14 फेब्रुवारी रोजी तेलंगणातील सर्व 709 पोलीस ठाण्यात सरमा यांच्या विरोधात फौजदारी तक्रारी दाखल करणार आहेत. Controversy over Assam Chief Minister Himanta Biswa Sarma’s statement, Telangana Congress to lodge complaint in 709 police stations tomorrow


    वृत्तसंस्था

    हैदराबाद : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण तापले आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीने आज एक ठराव संमत करून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना तत्काळ बडतर्फ करण्याची आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी केली आहे. तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी म्हणाले की, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे वक्तव्य गांधी कुटुंब किंवा काँग्रेसच्याच विरोधात नाही तर मातृत्वाचा अपमान आहे. काँग्रेस कार्यकर्ते 14 फेब्रुवारी रोजी तेलंगणातील सर्व 709 पोलीस ठाण्यात सरमा यांच्या विरोधात फौजदारी तक्रारी दाखल करणार आहेत.

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधींची भाषा 1947 पूर्वी जीनांची होती तशीच आहे, असे ते म्हणाले. त्यांनी राहुल गांधींना आधुनिक जिनाही म्हटले. राहुल गांधींच्या आत जिनांचं भूत शिरल्यासारखं वाटतंय, असं मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वी उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, सीएम बिस्वा म्हणाले होते की, राहुल गांधींनी देशाचे पहिले संरक्षण प्रमुख दिवंगत बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितला होता. ‘तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही, याचा पुरावा मी कधी मागितला आहे का?’

    लष्कराने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या सांगण्यावर काँग्रेसने विश्वास ठेवावा आणि त्यात कोणताही वाद नसावा, असेही मुख्यमंत्री बिस्वा सरमा म्हणाले. एकेकाळी जनरल रावत यांना ‘सडक का गुंडा’ म्हणणारी काँग्रेस आज त्यांच्या नावावर कटआऊट लावून मते मागत आहे, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली. मुख्यमंत्री बिस्वा म्हणाले की, जिन्ना यांचा आत्मा राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये स्थिरावला आहे आणि ते जीना जे म्हणायचे, फाळणीसाठी दोषी आहेत त्याबद्दल ते बोलत आहेत. आसाममधील काँग्रेस सरकारच्या अल्पसंख्याक तुष्टीकरणाचे डाग आपणच धुत आहोत, असे ते म्हणाले. नमाजासाठी सुटी जाहीर करणारे काँग्रेस नेते उत्तराखंडमध्ये बंद खोल्यांमध्ये मुस्लिम विद्यापीठाचे आश्वासन देत आहेत. देवभूमीत काँग्रेसचा हा मनसुबा भाजप कदापि पूर्ण होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

    Controversy over Assam Chief Minister Himanta Biswa Sarma’s statement, Telangana Congress to lodge complaint in 709 police stations tomorrow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!