• Download App
    खर्गेंच्या घरच्या बैठकीला 18 पक्षांचे नेते; कर्नाटकात काँग्रेस सरकारच्या शपथविधीला 9 पक्षांचे नेते हजर!! Contradiction on opposition unity comes out in karnataka 9 opposition leaders attended swearing in ceremony

    खर्गेंच्या घरच्या बैठकीला 18 पक्षांचे नेते; कर्नाटकात काँग्रेस सरकारच्या शपथविधीला 9 पक्षांचे नेते हजर!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्नाटकात भाजपचा पराभव करून सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारच्या शपथविधीला काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्वतः फोन करून बोलवले होते. यापैकी 9 पक्षांचे नेते या शपथविधीला हजर होते. या सर्व नेत्यांनी बंगलोरच्या स्टेडियम मध्ये विरोधी ऐक्याचे वेगळे दर्शन घडवले.Contradiction on opposition unity comes out in karnataka 9 opposition leaders attended swearing in ceremony

    पण त्याच वेळी विरोधी ऐक्या मधली एक विसंगती देखील समोर आली, ती म्हणजे कर्नाटक निवडणुकीपूर्वी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याच नवी दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला तब्बल 18 पक्षांचे नेते हजर होते आणि आज काँग्रेस सरकारच्या शपथविधीला मात्र त्याच्या निम्मे फक्त 9 पक्षांचे नेते हजर असल्याचे दिसले.

    मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या बैठकीत विरोधी ऐक्य साधण्यावर भर देण्याचे सुरुवातीला ठरले होते. पण प्रसार माध्यमांमध्ये मात्र त्यावेळी विषय गाजला, तो सावरकर मुद्द्यावर शरद पवारांनी राहुल गांधींना सुनावल्याचा!! त्या बैठकीच्या आधीच राहुल गांधींनी तीन वेळा सावरकरांचा माफीनामा वाचून दाखवत अपमान केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा भाजपने तब्बल 288 विधानसभा मतदारसंघात काढली. त्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या बैठकीला बैठकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधींना सावरकर “समजावून” सांगितले होते. सावरकरांची विज्ञाननिष्ठ भूमिका, त्यांचे सामाजिक कार्य याविषयीची माहिती दिली होती. तसेच राहुल गांधींनी सावरकर विषयावर यापुढे गप्प राहावे, अशी सूचना केली होती. त्यावर स्वतः मल्लिकार्जुन खर्गे यांनी मान डोलवली होती. त्या बैठकीतल्या सर्व 18 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पवारांच्या भूमिकेला भूमिकेवर सहमती दर्शवली होती आणि त्यानंतर सर्व नेत्यांमध्ये विरोधी ऐक्य साधण्यावर चर्चा झाली होती.

    त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुका पार पडल्या. काँग्रेसने भाजपचा मोठा पराभव केला. चार दिवसांतच आपला नेता निवडला आणि सिद्धरामय्या मुख्यमंत्री, तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री या सरकारचा आज शपथविधी झाला. या शपथविधी समारंभाचे निमंत्रण स्वतः मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना फोन करून दिले होते. विरोधकांनी त्यांना प्रतिसादही दिला होता. पण प्रत्यक्षात शरद पवार, नितीश कुमार, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, हेमंत सोरेन, एम. के. स्टालिन, डी. राजा हे प्रमुख नेतेच शपथविधी समारंभाला हजर राहिले. उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांनी त्या समारंभाला येण्याचे टाळले. स्वतः ऐवजी त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून अनुक्रमे खासदार काकूली घोष आणि खासदार अनिल देसाई यांना शपथविधी समारंभाला पाठवले होते.

    एकूण 9 विरोधी पक्षांचे महत्त्वाचे नेते शपथविधी समारंभाला हजर होते. पण विरोधी ऐक्यातली हीच मोठी विसंगती ठरली. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या बैठकीला 18 पक्षांचे बडे नेते हजर आणि काँग्रेसच्या विजयानंतर कर्नाटक सरकारच्या शपथविधीला फक्त 9 पक्षांचे नेते हजर ही ती विसंगती होय. यातून विरोधक 2024 साठी स्वतःचे ऐक्य कसे साधणार??, हा प्रश्न तयार झाला आहे.

    Contradiction on opposition unity comes out in karnataka 9 opposition leaders attended swearing in ceremony

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य