‘शक्ती’ सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सोबत एक करार देखील करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय सैन्याची अग्निशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने ‘पिनाका मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीम’ साठी एरिया डिनायल ऑर्डनन्स टाइप-१ आणि हाय एक्सप्लोसिव्ह कॅपॅबिलिटी रॉकेट्स खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी संरक्षण कंपन्यांसोबत १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे करार केले.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात असेही म्हटले आहे की ‘शक्ती’ सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सोबत एक करार देखील करण्यात आला आहे.
मंत्रालयाने सांगितले की, पिनाका रॉकेट सिस्टीमच्या अपग्रेडेशनसाठी त्यांनी इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लिमिटेड (EEL) आणि म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) सोबत १०,१४७ कोटी रुपयांचे करार केले आहेत. नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.