• Download App
    एमआयएमआय उत्तर प्रदेशात लढविणार १०० जागा; मायावतींच्या स्वबळापाठोपाठ असदुद्दीन ओवैसींची घोषणा contest 100 seats in the upcoming UP election. Party has begun the selection process of candidates

    एमआयएमआय उत्तर प्रदेशात लढविणार १०० जागा; मायावतींच्या स्वबळापाठोपाठ असदुद्दीन ओवैसींची घोषणा

    वृत्तसंस्था

    हैदराबाद – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बहुजन समाज पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा मायावतींनी केल्यापाठोपाठ हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आपला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल-मुसलमीन (एमआयएमआय) पक्ष उत्तर प्रदेशात विधानसभेच्या १०० जागा लढवेल, असे जाहीर केले आहे. contest 100 seats in the upcoming UP election. Party has begun the selection process of candidates

    ओवैसींच्या पक्षाने उत्तर प्रदेशात ओमप्रकाश राजभर यांच्या सोहेलदेव पार्टीशी निवडणूक समझोता आधीच केला आहे.

    आज मायावतींनी स्बबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा करताना ओवैसींच्या पक्षाशी समझोत्या केल्याच्या बातम्यांचे खंडन केले होते. त्यानंतर ओवैसी यांनी ट्विट करून एमआयएमआय पक्ष १०० जागा लढविणार असल्याचे जाहीर केले.

    उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत १०० जागांसाठी पक्षाने उमेदवारांच्या निवड प्रक्रियेस सुरूवात केली आहे. आम्ही ओम प्रकाश राजभर यांच्या भागीदारी संकल्प मोर्चाशी आघाडी केली आहे, अन्य कोणाशीही नाही, असा खुलासाही खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

    पंजाब सोडून उत्तर प्रदेश व उत्तराखंड मधील पुढील वर्षी सुरू होणाऱ्या विधानसभेची निवडणूक बीएसपी कोणत्याही पक्षाशी आघाडी करून लढणार नाही, म्हणजे, स्वबळावरच निवडणूक लढवणार, असं मायावतींनी आज ट्विटरवरून जाहीर केले आहे.

    contest 100 seats in the upcoming UP election. Party has begun the selection process of candidates

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त