विशेष प्रतिनिधी
विजयवाडा : उच्च न्यायालयाचा अवमान करणे आंध्र प्रदेशातील आठ आयएएस अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. या अधिकाऱ्यांना आता महिन्यातून एक दिवस सामाजिक सेवा करावी लागणार आहे.Contempt of the High Court cost IAS officers dearly, now the social services they have to do every month
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने अवमान केल्याप्रकरणी 8 आयएएस अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने अधिकाऱ्यांना 2 आठवड्याचा तुरुंगवास सुनावला आहे. अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर न्यायालयाने निकालपत्रात बदल केला.
- महत्त्वाची बातमी : घटस्फोटित पतीला शिक्षक पत्नीने दरमहा द्यावी पोटगी, औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश
आठ आयएएस अधिकाऱ्यांना वषार्तील प्रत्येक महिन्यात एक दिवस कल्याणकारी हॉस्टेलमध्ये सामाजिक सेवा करण्याचे आदेश दिले आहेत.यापूर्वी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने शाळांच्या ठिकाणी ग्रामसचिवालय बांधण्यास मनाई केली होती.
त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली होती. आदेशाचं उल्लंघन झाल्याचं याचिकाकर्त्यांनी कोर्टाच्या लक्षात आणून दिलं यानंतर न्यायालयाने आयएएस अधिकाऱ्यांना फटकारलं आहे.
आयएएस अधिकारी गोपाल कृष्ण द्विवेदी, बुदिती राजशेखर, विजया कुमार, श्यामला राव, श्री लक्ष्मी, गिरीजा शंकर, वी. छिन्ना वीरबंडारू, एनएम नायक यांच्यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला.
Contempt of the High Court cost IAS officers dearly, now the social services they have to do every month
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : एनसीबीला मोठा दिलासा, कोर्टाने आरोपपत्र दाखल करण्याची मुदत 60 दिवसांनी वाढवली
- कामाची माहिती : आजपासून झाले हे 8 मोठे बदल, गृहकर्जाच्या व्याजावरील सबसिडी संपुष्टात, महामार्गावर भरावा लागणार जास्तीचा टॅक्स
- लंकेला लागली महागाईची आग : श्रीलंकन रुपयाचे अवघ्या महिनाभरात 46 टक्के अवमूल्यन, कसे ठरतात डॉलरच्या तुलनेत दर? वाचा सविस्तर…
- काँग्रेसची आंदोलने जोमात, संघटना कोमात : स्वप्ने भाजपला हरवण्याची; पण महत्त्वाच्या राज्यांत प्रदेशाध्यक्षही नाही, 3 राज्यांत तर विरोधी पक्षनेताही ठरला नाही