• Download App
    मेरठ मध्ये कोरोना मदतीच्या नावाखाली 400 लोकांच्या सामूहिक धर्मांतराचे कारस्थान उघडकीस; पोलिसांचे चौकशीचे आदेश|Conspiracy of mass conversion of 400 people exposed in Meerut in the name of Corona aid; Police inquiry orders

    मेरठ मध्ये कोरोना मदतीच्या नावाखाली 400 लोकांच्या सामूहिक धर्मांतराचे कारस्थान उघडकीस; पोलिसांचे चौकशीचे आदेश

    वृत्तसंस्था

    मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ शहरामध्ये कोरोना मदतीच्या नावाखाली एक दोन नव्हे, तर तब्बल 400 लोकांचे सामूहिक धर्मांतर घडवून आणण्याचे कारस्थान उघडकीस आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा सिलसिला सुरू असल्याचे या धर्मांतराच्या जाळ्यात सापडलेल्या लोकांनी सांगितले आहे. या संदर्भात मेरिटमध्ये पोलिसात तक्रार झाली असून त्याची चौकशी करण्याच्या या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेशही पोलिसांनी दिले आहेत.Conspiracy of mass conversion of 400 people exposed in Meerut in the name of Corona aid; Police inquiry orders



    मेरठ शहरातील मंगतपुरी आणि ब्रह्मपुरी भागात राहणाऱ्या लोकांना कोरोना काळात काम नव्हते. लोकांचे सर्वसामान्य जीवन जगणे कोरोना काळात कठीण झाले होते. त्यावेळी काही ख्रिस्ती धर्मगुरू मंगतपुरी आणि ब्रह्मपुरी भागातील वस्त्यांमध्ये आले. त्यांनी सुरुवातीला लोकांना पैसे आणि धान्याची मदत केली. सुरुवातीला त्यांचा मदतीद्वारे विश्वास संपादन केला आणि हळूहळू ख्रिस्ती धर्म प्रसार करायला सुरुवात केली. त्यानंतर लोकांच्या सनातन धर्मावरील विश्वास डळमळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या घरातील देवदेवतांचे फोटो मूर्ती हटवायला सुरुवात केली. लोकांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव वाढवायला सुरुवात केली.

    हा प्रकार लोकांना असह्य झाल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांच्या मदतीने इथल्या लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी आणि तपास करण्याचे आदेश मेरठचे विशेष पोलीस महानिरीक्षक पियुष सिंह यांनी दिली आहे.

    Conspiracy of mass conversion of 400 people exposed in Meerut in the name of Corona aid; Police inquiry orders

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त