वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाटण्यात झालेल्या विरोधी ऐक्याच्या अब्रूची लक्तरे दिल्लीच्या वेशीवर आज काँग्रेसने टांगली. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारच्या मोफत वीज वाटपाची पोलखोल करताना काँग्रेसने त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.Congress workers protest against Delhi government over hike in power tariffs.
दिल्लीत केजरीवाल सरकारने 1 जुलैपासून 10 % टक्के वीस दर वाढ केली आहे. पण प्रत्यक्षात गेल्या 3 वर्षात सातत्याने वीज दरवाढ करून ती 30 % वर पोहोचली आहे याचाच निषेध करण्यासाठी काँग्रेसने केजरीवालांच्या घरासमोर मोठे आंदोलन केले.
याच केजरीवालांसमवेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी पाटण्याच्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत बसले होते. पण आता मात्र त्यांना दिल्लीतली वीजदर वाढ सहन होईनाशी झाल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केजरीवालांच्या घरासमोर आंदोलन केले.
केजरीवालांनी दिल्ली आणि पंजाबची निवडणूक मोफत वाटपातून जिंकली. नागरिकांना वीज मोफत देण्याची आकर्षक घोषणा केली. पण त्यामुळे दोन्ही सरकारांच्या तिजोरीवर फार मोठा बोजा पडला. त्यामुळे केजरीवालांनी नवी आयडिया लढवत 200 युनिट पर्यंत वीज मोफत आणि त्यानंतरची वीज विकत, असा फॉर्म्युला राबविला आणि गेल्या 3 वर्ष टप्प्याटप्प्याने दरवर्षी 10 % वीज दरवाढ करत दिल्लीत एकूण 30 % वीज दरवाढ केली. काँग्रेसने त्यांच्याविरोधात गेल्या दोन वर्षात कधी आंदोलन केले नाही. पण आता मात्र दिल्लीकरांना वीज दरवाढ असह्य झाल्याचे सांगत केजरीवाल सरकार विरुद्ध आंदोलन केले.
Congress workers protest against Delhi government over hike in power tariffs.
महत्वाच्या बातम्या
- कुस्तीपटूंचे आंदोलन संपवण्याची घोषणा; साक्षी-विनेश आणि बजरंग म्हणाले- आता लढाई रस्त्यावर नाही, तर कोर्टात लढू
- आपने म्हटले- राहुल गांधींनी मोठे मन दाखवावे, मोहब्बत की दुकानवर सवाल; काँग्रेसचा पलटवार- केजरीवाल यांना तुरुंगाची भीती
- पंतप्रधान मोदींना मागील ९ वर्षांत जगभरातील देशांनी प्रदान केलेले सर्वोच्च पुरस्कार तु
- पतीने विकत घेतलेल्या संपत्तीतही पत्नीचा समान हक्क; मद्रास हायकोर्टाने म्हटले- पैसा पतीने कमावला असला तरी पत्नीमुळेच ते शक्य